शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Cabinet Expansion: एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १२ ऑगस्टला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 09:50 IST

Eknath Shinde Cabinet Expansion: छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरांवरील अपात्रतेच्या कारवाईवर सुनावणी सुरु आहे.

महाराष्ट्रात ठाकरे सरकार जाऊन ३९ दिवस झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरांवरील अपात्रतेच्या कारवाईवर सुनावणी सुरु आहे. यामुळे छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

एनबीटीने विश्वासू सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. यानुसार भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक ८ आमदारांना मंत्रिपद मिळणार असल्याचे समजते. यामध्ये प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे ८ जण मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार सारखे माजी मंत्री देखील असतील.

पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. यावरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. दानवे यांचे हे वक्तव्य व्हायरल होताच दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. शिंदे गटाचे खासदार आमच्यासोबत असून त्यांना विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही आमचा पक्ष मजबूत करत आहोत, तरीही शिवसेनेचे खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही आमची सर्व शक्ती वापरणार आहोत, असे फडणवीस म्हणाले. 

लवकरच चित्र स्पष्ट होणार- मुख्यमंत्री आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे परंतु या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही अडथळे येण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होईल. 

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १२ ऑगस्टला शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारी होणार नसून येत्या १२ ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या कामकाजामध्ये या याचिकेचा उल्लेख नाही. येत्या १२ ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश सोमवारी नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपा