- श्रीकृष्ण अंकुश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये एकमेकांच्या पक्षातील नेते गळाला लावण्याची खेळी खेळली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
शिंदे यांनी राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा गट) विद्यमान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असलेले गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील हे शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
"मला कुणावरही आरोप करायचे नाहीत. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द चांगली राहिली आहे. शिवसेना माझा जुना पक्ष आहे. यामुळे समर्थकांसह त्यात पुन्हा प्रवेश करत आहे, असे कैलास पाटील यांनी सांगितले.
संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. यावेळी एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.