शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bacchu Kadu: शिंदे-फडणवीस फेविकॉलपेक्षा मजबूत जोड, बच्चू कडूंचं विधान; कोणतं मंत्रीपद हवं तेही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 11:36 IST

राज्यात शिंदे आणि फडणवीसांच्या रुपात स्थापन झालेलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून येत्या काळात सरकारकडून चांगली कामं होतील असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई-

राज्यात शिंदे आणि फडणवीसांच्या रुपात स्थापन झालेलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून येत्या काळात सरकारकडून चांगली कामं होतील असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू यांनी शिंदे सरकारवर कौतुकाचा वर्षाव तर केलाच त्यासोबत शिंदे गटात सामील होण्यामागचं कारणही सांगितलं. 

राष्ट्रवादीकडून मतदार संघात निधी मिळत नव्हता. शेवटी जनतेची काम करत असताना तुम्ही मंत्री असलात तरी तुमचा मतदार संघच तुमच्यासाठी महत्वाचा असतो. एकनाथ शिंदेंच्याच माध्यमातून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता, असं बच्चू कडू म्हणाले. 

"शिंदे आणि फडणवीस फेविकॉलपेक्षा मजबूत जोड आहे. सरकार कोसळणार असं सांगण हे विरोधकांचं कामच असतं. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही", असंही बच्चू कडू म्हणाले. 

दिव्यांगांसाठी काम करण्याची इच्छाशिंदे सरकारमध्ये कोणतं मंत्रीपद मिळणार याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झाली आहे का? असं विचारलं असता बच्चू कडू यांनी मंत्रिपदापेक्षा मतदार संघातील विकास महत्वाचा असतो असं म्हटलं. तसंच माझ्यासाठी दिव्यांगांचा विषय महत्वाचा आहे. कुणाला कोणतं मंत्रिपद मिळतंय याकडे लक्ष देत नाही. दिव्यांगांसाठी वेगळा विभाग बनवून त्याचा चार्ज जर माझ्याकडे दिला तर नक्कीच त्यासाठी चांगलं काम करता येईल, अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली. 

शिंदे किंतू परंतू न ठेवता प्रेम करणारा माणूस"एकनाथ शिंदेंना कोण काय म्हणतंय यात लक्ष देण्यासारखं काहीच नाही. कारण त्यांना रिक्षावाला वगैरे म्हणणं हे त्यांना देखील वाईट वाटणार नाही. शिंदे किंतू परंतू न ठेवता प्रेम करणारा माणूस आहे. आम्ही सुद्धा शेतकरी, दूध वाटणारे आहोत. आता दूध वाटणारा म्हणण्यात वाईट काय आहे? कोणतंही काम वाईट नसतं. तुम्ही सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधीत्व करत असता आणि हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे असं जनतेला वाटणं हेच अधिक महत्वाचं आहे", असं बच्चू कडू म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदे