शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंची नाराजी दूर होईल - मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:38 IST

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारासंदर्भात ते म्हणाले, नागपुरात एकीकडे अधिवेशन सुरू असताना याच शहरात त्यांच्या वाहनावर गोळीबार होणे ही घटना धक्कादायक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असले तरी त्यांच्याशी वरिष्ठ पातळीवरून संपर्क सुरू आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

मुनगंटीवार म्हणाले, भाजपामध्ये महाराष्टÑात सर्वांनीच उत्तम काम केले आहे. मात्र सर्वांच्याच मनासारखे होईल, असे नसते. आपल्या मनाविरुद्ध काही घडले असले तरी कार्यरत राहणे हीच भाजपाची शिकवण आहे. खडसे हे पक्षातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना यासंदर्भात सर्व काही कल्पना आहे. त्यामुळे पक्षाची चौकट ते मोडणार नाहीत.

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारासंदर्भात ते म्हणाले, नागपुरात एकीकडे अधिवेशन सुरू असताना याच शहरात त्यांच्या वाहनावर गोळीबार होणे ही घटना धक्कादायक आहे. अधिवेशन काळातच महापौर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांची काय स्थिती, असा प्रश्न उपस्थित होतो. याप्रकरणी सरकारला सभागृहात जाब विचारला जाईल, असे त्यांनी सांगितले.तर मी भाजपमध्येच राहणार असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ते राष्ट्रवादी वा अन्य पक्षात जाणार असल्याच्या वृत्ताचा बुधवारी इन्कार केला. माझ्यावर अन्याय सुरूच राहिला तर वेगळा विचार करावा लागेल, असे सांगत खडसे यांनी अलीकडेच भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही त्यांच्यावरील अन्यायासंदर्भात आवाज उठविला होता पण आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे नंतर त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार