शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

By अतुल कुलकर्णी | Updated: November 23, 2017 06:41 IST

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. दरदिवशी आठ, याप्रमाणे गत दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर आलेली नापिकी, बी-बियाण्यांवरील वाढता खर्च, शेतमालाचे पडलेले भाव, घटलेली उत्पादकता आणि त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, या कारणांस्तव शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर, आॅगस्ट, सप्टेंबर ते आॅक्टोबर या काळात ७८८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.सहा महसूल विभागीय कार्यालयांतील आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत राज्यातील २,४१४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी १,२७७ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली आहे. उर्वरित ११३७ शेतकºयांची आत्महत्या शासकीय निकषांस पात्र ठरलेल्या नाहीत. अर्थात, त्यांनी कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी मृत्यूला कवटाळले, अशी सरकारची माहिती आहे.>अधिकारी काम करायला तयार नाहीतशेतकºयांना आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, आपण सुचविलेले उपाय व दिलेल्या दिलेलेसल्ले शासकीय अधिकाºयांनी केराच्या टोपलीत टाकले. सगळी यंत्रणा सडलेली आहे. अधिकारी जमिनीवर काम करायलाच तयार नाहीत. सरकारच्या चांगल्या योजना हाणून पाडणाºया अधिकाºयांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत, असे उद्वेगजनक मत या मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मागच्या वर्षी रोज सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करत होते. या वर्षी ते प्रमाण ८ वर गेले आहे, यावरून सरकारचा कृषी विकासाचा दावा किती फसवा आहे, हे दिसून येते. कर्जमाफी मिळाली नाही, उलट सक्तीची वीजबिलाचीवसुली चालू आहे.- धनंजय मुंडे, विरोधीपक्ष नेते, विधानपरिषदसरकार जोपर्यंत धोरणांमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. मुख्यमंत्री एकटे काही चांगले करतील, असे म्हणून सगळी बोटे त्यांच्याकडे दाखवून काहीही साध्य होणार नाही.-किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनशेतकºयांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यास हे सरकार कमी पडले. आपले कोणीच नाही असे वाटून शेतकºयांनी हा पर्याय निवडला. सदाभाऊ खोत मंत्री झाले, पण ते काहीही करू शकले नाहीत.- खा. राजू शेट्टी,शेतकरी संघटना

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकार