शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

विदर्भात धग कायमच आणखी आठ बळी

By admin | Updated: June 10, 2014 01:10 IST

विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. कडक उन्हाच्या तडाख्यात उष्माघाताने विदर्भात आणखी आठ जणांचा बळी घेतला आहे. यात अमरावती जिल्ह्यातील तीन, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात

नागपूर : विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे.  कडक उन्हाच्या तडाख्यात उष्माघाताने  विदर्भात आणखी आठ जणांचा बळी  घेतला आहे. यात अमरावती जिल्ह्यातील तीन, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर चंद्रपूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात दोघांचा तर एकाचा बडनेरा येथे मृत्यू झाला. हातुर्णा येथील बहिणाबाई विश्‍वनाथ बंड (६७) या राहत्या घरी  मृतावस्थेत आढळून आल्या तर धनोडी मार्गावरील रामदेव बाबा लॉनजवळ एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळला. या मृतदेहाची अद्यापही  ओळख पटली नाही.चंद्रपूर जिल्ह्यातील पेंढरी कोके येथील वनिता सोनबाजी नान्हे (४७) हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. वनिता मागील दोन दिवसांपासून  घरून बेपत्ता होती. दरम्यान, रविवारी रात्री तिचा मृतदेह मच्छी सहकारी संस्थेच्या कार्यालय परिसरात असलेल्या समाजमंदिराजवळ आढळून आला. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील दिलीप भाऊराव क्षीरसागर (५0) नामक इसमाचा मृतदेह सोमवारी सकाळी यशोदा नदीच्या बाजूला असलेल्या मंदिर  परिसरात आढळून आला. दिलीप वेडसर असल्यामुळे तो दिवसभर उन्हातान्हात भटकंती करुन तसेच कुणालाही जेवण मागून मंदिर परिसरात राहत होता. उन्हाच्या  तडाख्यातसुद्धा त्याचे वास्तव्य  उघड्यावरच होते. यामध्येच त्याचा अन्नपाण्याशिवाय उष्माघाताने बळी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसर्‍या घटनेत रविवारी यवतमाळ मार्गावर नजीकच्या भिडीपासून  दीड किमी अंतरावर राजेश रहागंडाले (४0) रा. सोनेगाव ता. कळंब याचा मृतदेह  रस्त्याच्या कडेला आढळून आला. राजेश हा कळंबवरून देवळीकडे एसटी बसने येत होता. तिकीटचे पैसे नसल्यामुळे त्याला शिरपूर फाट्याजवळ बस  वाहकाने उतरवून दिले. त्यामुळे तो पायदळ अनवानी चालत असताना चक्कर येऊन खाली पडला व त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात  र्ईी येथील पृथ्वीराज बाबुलाल तरोणे (३२) या इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत देवरी ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ६ (परसटोला)  येथील आनंदाबाई बुधाजी मडावी (७0) यांची प्रकृती रविवारी सायंकाळी ६ वाजता उष्माघातामुळे बिघडली. रात्री ९ वाजताच्या सुमारास राहत्या  घरीच त्यांचा मृत्यू झाला.