शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

इतिहासाचे साक्षीदार रायगडसह १४ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्याच्या हालचाली, राज्य सरकारचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 05:52 IST

हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख हे स्वतः पाठपुरावा करत आहेत. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित १४ किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा द्यावा, असा प्रयत्न सुरू आहे.

समीर परांजपे -

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी रायगडसहित महाराष्ट्रातील १४ किल्ले तसेच कोकणातील कातळ शिल्पांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याकरिता युनेस्कोला महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व खाते एक विस्तृत प्रस्ताव पाठविणार आहे. तो प्रस्ताव तयार करण्यासाठी तज्ज्ञांकडून पुरातत्त्व खात्याने निविदा मागविल्या आहेत. त्या प्रक्रियेनंतर विस्तृत प्रस्ताव तयार करण्याचे काम आगामी दीड वर्षांत मार्गी लागेल.हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख हे स्वतः पाठपुरावा करत आहेत. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित १४ किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा द्यावा, असा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्राने पाठविलेला प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोने तत्त्वत: स्वीकारला आहे. मात्र ही सर्व ठिकाणे जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी कशी योग्य आहेत व त्यांचे जतन कसे केले जाईल याचा एक विस्तृत प्रस्ताव तज्ज्ञांकडून तयार करून घ्यावा लागतो. तो युनेस्कोला सादर केल्यानंतर त्यांची तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. त्यानंतरच त्या स्थळांना जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत युनेस्को निर्णय घेते. दरवर्षी १८ एप्रिलला युनेस्कोतर्फे जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील मराठा लष्करी स्थापत्य व गनिमी कावा या दोन गटांत १४ किल्ल्यांचा समावेश करून तो प्राथमिक प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला होता. हीच प्रक्रिया महाराष्ट्रातील कातळ शिल्पांबाबतही पार पाडण्यात आली. गोव्यातील फणसईमाळ येथील कातळ शिल्पाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. 

या प्रमुख कातळ शिल्पांचा समावेशमहाराष्ट्रातील कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण,अक्षी, कुडोपी व गोव्यातील फणसईमाळ येथील कातळ शिल्पांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. 

कोणते आहेत १४ किल्ले?-रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग (कुलाबा किल्ला), सुवर्णदुर्ग, खांदेरी

हजारो वर्षांपूर्वी चितारण्यात आलेली महाराष्ट्रातील कातळ शिल्पे हे देशाचे महत्त्वाचे सांस्कृतिक संचित असून ते नीट जतन व्हायला हवे, असे पुरातत्त्व  शास्त्रज्ञांचे मत आहे.

विस्तृत प्रस्ताव तयार करणार -कातळ शिल्पांना आणि किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या प्राथमिक प्रस्तावाला युनेस्कोने तत्त्वतः मंजुरी दिली. पुढील टप्प्यात या ठिकाणांचा विस्तृत प्रस्ताव तज्ज्ञांच्या सहभागातून तयार करून तो युनेस्कोला पाठविला जाईल.     - डॉ. तेजस गर्गे, संचालक, महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग 

टॅग्स :FortगडRaigadरायगडsindhudurgसिंधुदुर्गState Governmentराज्य सरकार