शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘ला-निनो’च्या प्रभावामुळे आंबा हंगाम लांबणार? हवामान बदलाचा परिणाम; काजू पिकालाही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 06:55 IST

‘ऑक्टोबर हीट’मुळे जमीन कोरडी होते. त्याचा झाडांच्या मुळांवर नैसर्गिक ताण येतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर आंबा, काजूच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो. मात्र ‘ला-निनो’च्या प्रभावामुळे वादळी पाऊस अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. जर हा ओलावा कमी झाला नाही तर आंबा हंगाम लांबणीवर पडणार, हे निश्चित.

रत्नागिरी : पॅसिफिक महासागरात ‘ला-निनो’चा प्रभाव मे महिन्यापासून राहिल्याने यावर्षी पावसाळा लांबला आहे. हेच वातावरण कायम राहिल्यास हवामानातील बदलाचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची भीती आहे. परिणामी, आंब्याचा हंगाम यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ‘ऑक्टोबर हीट’मुळे जमीन कोरडी होते. त्याचा झाडांच्या मुळांवर नैसर्गिक ताण येतो. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर आंबा, काजूच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो. मात्र ‘ला-निनो’च्या प्रभावामुळे वादळी पाऊस अधूनमधून सुरूच आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा अद्याप कायम आहे. जर हा ओलावा कमी झाला नाही तर आंबा हंगाम लांबणीवर पडणार, हे निश्चित.

काय आहे ‘ला-निनो’?पॅसिफिक महासागरामध्ये विषुववृत्तीय प्रदेशातील पाण्याचे तापमान अचानक कमी होते. यामुळे आशिया व पॅसिफिक महासागराच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पॅसिफिक महासागरात मे महिन्यापासून शून्य ते उणे ०.५ एवढे तापमान राहिले आहे. सध्या हे तापमान उणे १ इतके झाले आहे. त्यामुळे या स्थितीला नॉर्मल ‘ला-निनो’ असे संबोधले जाते. सध्या नॉर्मल ‘ला-निनो’चा प्रभाव आहे. त्याच्या प्रभावामुळे जागतिक थंडीचीही लाट येऊ शकते.

असा आहे ‘अल्-निनो’ -‘अल्-निनो’ म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशातील पॅसिफिक महासागरात पाण्याचे तापमान अचानक वाढणे. यामुळे आशिया व प्रशांत महासागराच्या प्रदेशात पाऊस कमी होऊन दुष्काळी स्थिती उद्भवते व दक्षिण अमेरिका खंडात अतिवृष्टी होऊन पुराचा सामना करावा लागतो. सध्या पाऊस थांबण्यासाठी ‘अल्-निनो’चा प्रभाव वाढण्याची आवश्यकता आहे. ‘अल-निनो’ चा प्रभाव वाढला तर उबदार वातावरण किंवा उष्णतेची लाट येऊ शकते.

भारतीय हवामान विभागाने मार्चपर्यंत ‘ला निनो’ नॉर्मल राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे हवेत गारठा राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर निम्मा अधिक संपला तरी पाऊस रेंगाळला आहे. ऑक्टोबर हीट जाणवली नसल्याने झाडांच्या मुळांना नैसर्गिक ताण न बसल्याने गारठा वाढला तरी त्याचा प्रभाव झाडांवर होणार नाही. परिणामी यावर्षी आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. -डॉ. व्ही. जी. मोरे, हवामान शास्त्रज्ञ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

टॅग्स :Mangoआंबाweatherहवामान