शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम; भाजपचे मनोबल वाढले, मविआची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 07:03 IST

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीला करावी लागणार मोर्चेबांधणी

यदु जोशी

मुंबई : चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने मिळविलेली सत्ता लक्षात घेता या पक्षाच्या महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्त्यांचे मनोबल नक्कीच वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत ४२चा आकडा गाठण्यासाठीच्या महाराष्ट्र भाजपच्या प्रयत्नांना त्यामुळे  बळ मिळेल. भाजप आणि मित्रपक्षांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीला ठोस रणनीती आखावी लागणार आहे.

लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर असताना मिळालेले हे यश महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारे ठरले आहे. मध्य प्रदेशात २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार पाडून भाजपने सरकार स्थापन केले होते. यावेळी भाजपचा तेथे पराभव झाला असता तर काँग्रेसचे सरकार पाडण्याचा राग मतदारांनी व्यक्त केला, असा तर्क दिला गेला असता आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही रोष आहे आणि तो लोकसभा व विधानसभा निवडणुकीत व्यक्त होईल, असे म्हटले गेले असते. मात्र, हा तर्क महाराष्ट्रातही लागू होणार नाही असा मुद्दा रेटण्यासाठीचे ठोस कारण महाराष्ट्रातील भाजपला मिळाले आहे. 

माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांचा तेलंगणातील यशात वाटाकाँग्रेसने तेलंगणामध्ये मिळविलेल्या मोठ्या विजयाच्या शिल्पकारांपैकी दोन नेते महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे अ.भा. काँग्रसचे तेलंगणासाठीचे प्रभारी आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तेलंगणामध्ये काँग्रेसचे निवडणूक प्रभारी होते. ठाकरे-चव्हाण यांनी आखलेल्या रणनीतीचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या नेत्यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

चार राज्यांच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वाधिक २२ सभा अन् रोड शो आज निकाल जाहीर झालेल्या चार राज्यांपैकी तेलंगणा वगळता इतर तीन ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक होते. तेलंगणातही त्यांनी प्रचार केला. ४ राज्यांमध्ये त्यांनी २२ सभा घेतल्या आणि रोड शो केले. बहुतेक ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थान आणि तेलंगणामध्ये प्रचाराला गेले होते. भाजपच्या राज्यातील तीस आमदारांना मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील उमेदवार निश्चित करताना मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मोदींचा चेहरा समोर ठेवून फक्त लोकसभा निवडणूक जिंकता येते या समजाला तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाने छेद दिला आहे.  राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधून व्यवसाय आणि रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्यांची  संख्या मोठी आहे. आता मुंबईत भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. महाविकास आघाडीसमोरील आव्हाने आता वाढतील. शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याबाबत जागावाटप वाटाघाटीची भाजपची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत राज्यातील सध्याचे मंत्री, आमदारांना उतरवले जाऊ शकते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. तिथे पक्षाला रेकॉर्डब्रेक यश मिळाले. अनेक घटक महत्त्वाचे होते, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी