शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रान्स दूतावास यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:54 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रान्स दूतावास यांच्यात शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थ्यांना फ्रान्स दूतावासांचे सहकार्य लाभणार आहे. नऊ महिन्याच्या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे फ्रान्सला विद्यार्थी पाठवणार असून या त्यांना ५५,६00 रुपये मासिक विद्यावेतन फ्रान्स दूतावासातर्फे देण्यात येईल.

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि फ्रान्स दूतावास यांच्यात शनिवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थ्यांना फ्रान्स दूतावासांचे सहकार्य लाभणार आहे. नऊ महिन्याच्या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे फ्रान्सला विद्यार्थी पाठवणार असून या त्यांना ५५,६00 रुपये मासिक विद्यावेतन फ्रान्स दूतावासातर्फे देण्यात येईल.महाराष्ट्र शासन आणि फ्रान्स दूतावास यांच्यातील हा पहिला शैक्षणिक सामंजस्य करार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, डेप्युटी कॉउन्सेलर सहकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग अरुणा अदिसियाम आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सह सचिव सिद्धार्थ खरात आणि अरुणा अदिसियाम डेप्युटी कॉउन्सेलर सहकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांनी करारावर स्वाक्षºया केल्या.या कराराच्या माध्यमातून निवडक आठ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रान्स दूतावासामार्फत पुढाकार घेतला जाणार असून विभागामार्फत राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकांना याबद्दल माहिती दिली जाणार आहे.या करारान्वये फ्रान्सच्या भाषा आणि समाजांबद्दल त्यांचे भाषा कौशल्य आणि त्यांच्या स्वत:च्या संस्कृतीचे मौल्यवान ज्ञान फ्रेंच शाळांबाबत जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे हा असणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि फ्रान्स यांच्यामधील रोजगाराला प्रोत्साहन मिळू शकेल. या करारामुळे महाराष्ट्रातील ७ ते १५ विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात अभ्यासाची दालने निर्माण करुन विविध कार्यशाळाच्या माध्यमातून हे सहजरित्या साधता येणार असून दोन्ही देशात एक सांस्कृतिक देवाण-घेवाण याचे एक मोठे दालन यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात होईल.- विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे