शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

'गंगाखेड'च्या २५५ कोटींच्या मालमत्तेवर 'ईडी'ची टाच, कृषी कर्ज घोटाळा प्रकरणातील कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 06:41 IST

Gangakhed assets : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (जीएसईएल) कंपनीने शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ईडीने बुधवारी कारवाई केली.

मुंबई : गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेऊन त्यांची फसवणूक करत मिळालेल्या पैशांतून स्वत:च्या उद्योगांना अर्थपुरवठा करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी कारवाई करीत २५५ कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त केली. कृषी कर्ज घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे ईडीतर्फे सांगण्यात आले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (जीएसईएल) कंपनीने शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ईडीने बुधवारी कारवाई केली. ईडीने केलेल्या कारवाईमध्ये जीएसईएल कंपनीची २४७ कोटी रुपये किमतीची यंत्रे, जीएसईएलची पाच कोटी रुपये किमतीची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि जीएसईएलच्या १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता जप्त केली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र