शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने भावना गवळींना बजावले दुसरे समन्स; चौकशीला उद्या हजर राहण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 08:47 IST

बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात २० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या यवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना दुसरे समन्स बजवण्यात आले आहे. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात २० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. खासदार भावना गवळी यांच्या वाशिममधील महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील कर्मचाऱ्याचे  आणि त्यांचा निकटवर्तीय सईद खान यांनी केलेल्या रस्त्याच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी १२ ऑक्टोबरला  चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीच्या  आधारे ट्रस्टच्या प्रमुख गवळी यांच्याकडे चौकशी केली जाईल. त्यांचा सहकारी सईद खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्याकडील चौकशीतून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्याबाबत गवळी  यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे.  ईडीने समन्स काढून   ४ ऑक्टोबरला हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी गैरहजर राहत १५ दिवसांचा अवधी मागून घेतला. त्यामुळे ईडीने ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी अन्य पुरावे व जबाब मिळविण्यावर भर दिला आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचे  कंपनीमध्ये रूपांतर केल्याप्रकरणी तसेच शेल कंपन्यांद्वारे कोट्यवधीच्या देणग्या  कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काय आहे प्रकरण?गवळी यांच्याविरुद्ध हरीश सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आहे. १९९२ मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची स्थापना करून राज्य सरकारच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमकडून ४३ कोटीचे कर्ज मिळविले. २००२मध्ये गवळी यांनी या  कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. त्यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय