शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची नोटीस आल्यावर आम्ही गप्प बसलो नाही; राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 21:22 IST

नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोणत्या प्रकारची भाषा ऐकायला मिळतेय, भावी पिढ्यांना अशा नेत्यांकडून काय शिकावं, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. आता राऊत यांनी राज यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. आमचा पक्ष ओरिजिनल आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. आमचा पक्ष नकलांवर चालत नाही, तर कामावर आणि संघर्षावर उभा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

पुण्यात मनसेचा १६ वा वर्धापनदिन साजरा झाला. त्यानिमित्त आयोजित सभेत राज यांनी अनेकांना समाचार घेतला. संजय राऊतांची भुवया उडवून नक्कल करत राज यांनी त्यांची खिल्ली उडवली. राज यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही कोणाचे मिंधे नाही. ईडीची नोटीस आली म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहिलो. आवाज उठवत राहिलो, असं म्हणत राऊत यांनी राज यांना टोला लगावला.

ओबीसी आरक्षण नव्हे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम नसल्यानं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, असा दावा राज यांनी केला होाता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरेंइतकं सध्या सक्रीय कोणीच नाही. काही जण आजारी नसतानाही सक्रीय नसतात, असं म्हणत राऊत यांनी राज यांना चिमटा काढला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊत