शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरनाईकांच्या घरांसह ११ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने आणली टाच; शिवसेनेला आणखी एक झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 09:53 IST

 नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळा प्रकरणात ईडीकडून जप्तीची कारवाई

मुंबई :  केंद्रीय तपास यंत्रणांकडून थेट मातोश्रीपर्यंत ठकठक झाली असताना, शिवसेनेला आणखी एक झटका देण्यात आला.  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या राहत्या घरासह एकूण ११.३५ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.  नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळा प्रकरणात ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे. ईडीने नोव्हेंबर २०२० मध्ये सरनाईक कुटुंबीयांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंगचीही चौकशी केली होती. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सरनाईक यांचा व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांची कसून चौकशी करीत त्यांना अटकही केली होती. तसेच सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. पुढे त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने तपास थंडावला होता. मात्र, ईडीकडून पुन्हा कारवाईचा वेग वाढला आहे. तीन हजार कोटींची मालमत्ता जप्तएनएसईएल घोटाळा प्रकरणात आतापर्यंत ३,२४२. ६७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले.   काय आहे प्रकरण? एनएसईएलमध्ये १३ हजार गुंतवणूकदारांच्या तब्बल ५ हजार ६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सप्टेंबर २०१३ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याच्या आधारे ईडीनेही एनएसईएलच्या संचालकांसह प्रमुख अधिकारी आणि २५ घोटाळेबाजांविरोधात चौकशी सुरू केली. आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचून त्यांना एनएसईएलमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले व बनावट गोदाम, पावत्या,  कागदपत्रे आणि बनावट खाती तयार करून फसवणूक केली.आस्था ग्रुपकडे एनएसईएलची २४२.६६ कोटी रुपयांची थकबाकी होती. आस्था ग्रुपने २१.७४ कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रकल्पासाठी दिले. त्यापैकी ११.३५ कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडे वळते झाले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित आहेत.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय