शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मीरा-भाईंदरमध्ये ईको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना, देखाव्यात सामाजिक संदेशावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 20:20 IST

भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे साकारण्यात आली आहे.

राजू काळे/ भार्इंदर, दि. 31 - भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे साकारण्यात आली आहे. देखाव्यात चलचित्राद्वारे शहरातील समस्यांची तीव्रता दर्शविण्यात आली असून त्या सुधारण्यासाठी सामान्य नागरिक प्रशासन व राजकारण्यांकडे मागणी करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. 

मंडळाचे यंदा ७ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना मंडळाने केली असली तरी जगातील वेगवेगळ्या देशातील गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना, हे मंडळाचे आकर्षण ठरत असल्याचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांनी सांगितले. तसेच केबीन रोडवरील जय अंबे नगर गणेश मित्र मंडळाने यंदा मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून गतवर्षी या मंडळाने जेम्स या सुमारे २५ हजार चॉकलेटच्या गोळ्यांनी तयार केलेली मूर्ती साकारली होती. मंडळाने यंदा देशाच्या सीमारेषेचे रक्षण करणा-या सैनिकांच्या जीवनावर आधारीत देखावा चलचित्राद्वारे दाखविला आहे.  

मीरारोड येथील म्हाडा गृहसंकुल क्लस्टर तीनमधील स्वस्तिक संकुल सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाही कागदापासून बनविलेली सुमारे ५ फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. देखाव्यासाठी प्रदुषणाचा विषय निवडण्यात आला असून प्लास्टिक मुक्त संकल्पना राबविण्यात आली आहे. प्लास्टिकऐवजी कापड व कागदाच्या वस्तू वापरण्याची जनजागृती गणेशभक्तांत केली जात असल्याचे मंडळाचे पदाधिकारी अविनाश देगासकर यांनी सांगितले. भार्इंदर पश्चिमेकडील सिद्धी विनायक यंग स्टार गणेश मंडळ, विनायकनगर गणेश मंडळ, मोदी पटेल मार्ग गणेश मंडळ आदी मंडळांनी देखील शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यातील विनायक नगर गणेश मंडळाचे यंदा ४१ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी मंडळाने इको फ्रेन्डली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे पदाधिकारी केहुल शाह यांनी सांगितले. अशा प्रकारच्या इको फ्रेन्डली मूर्ती आणखी काही सार्वजनिक गणेश मंडळांकडून प्रतिष्ठापित केल्या असून काही घरगुती गणेशमूर्तीही शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आल्याचे दिसून आले. यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे 25 हून अधिक गणेश मंडळांनी इको फ्रेन्डली गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणारे काही मोजकेच मूर्तीकार शहरात असून ते सुद्धा ऑर्डरखेरीज मातीच्या मूर्ती बनवत नसल्याचे शाडूच्या मूर्ती घडविणारे गौतम बापट यांच्याकडून सांगण्यात आले. केवळ दोन फुटापर्यंतच्याच मूर्ती घरगुती गणेशोत्सवासाठी तयार करण्यात येत असून मोठ्या मूर्तींसाठी मात्र गणेशभक्तांना शहराबाहेरील मूर्तीकारांकडे ऑर्डर द्यावी लागत असल्याचे बापट यांनी सांगितले. याचप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांनी सामाजिक संदेशांवर भर देत भक्तांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याखेरीज शहरात प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी)च्या मूर्तींपासून जलप्रदुषण होत असतानाच गणेशमूर्तींना रत्नखड्यांची आभुषणांनी मढवल्याचे दिसून आले. विसर्जनानंतर पीओपी मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने जलप्रदुषण होत असताना त्यावरील रत्नखडेही पाण्यातील जलचरांच्या जीवावर बेतते. त्यामुळे अशा मूर्तींची प्रतिष्ठापना न करता शाडूची माती, कागद, हिरवळ, गवत, खाद्यपदार्थ वा अन्नधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमी अ‍ॅड. किशोर सामंत यांनी गणेशभक्तांना केले आहे.  

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव