सुरेश लोखंडे - ठाणो
विषाणूपासून होणारा ‘ईबोला’ हा जीवघेणा आजार परदेशात फोफावला आहे. मुंबई, ठाण्यात परदेशी पाहुणो मोठय़ा प्रमाणात ये-जा करीत आहेत. विमानतळावर त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहेच. पण, या रुग्णांच्या संपर्कासह सहवासामुळे या आजाराची लागण होणो शक्य आहे. यावर वेळीच मात करण्यासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत 1क् खाटांचा वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व डॉक्टर व रुग्णालयांना सतर्क करून सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मुंबई, ठाणो येथील दहीहंडी, गणोशोत्सव व नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवांना भेट देऊन आनंदोत्सव घेण्याकडे परदेशी पर्यटकांची ओढ अधिक आहे. यादरम्यान परदेशी पाहुण्यांशी बहुतांशी ठाणोकरांचा सहवास व संपर्क येत असतो. यातून विविध स्वरूपाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. यावर वेळीच मात करणो शक्य व्हावे, यासाठी मुंबई व ठाण्यातील सर्व डॉक्टरांची नुकतीच कार्यशाळा घेऊन त्यांना औषधोपचाराचे सखोल मार्गदर्शन करण्यात आल्याचे डॉ. कांबळे यांनी नमूद केले. आफ्रिकेतील गिनिया या देशात सुमारे नऊ महिन्यांपूर्वी हा आजार प्रथमच उघड झाला. यानंतर, सध्या लायबेरिया, सीरिया व नायजेरिया या ठिकाणी या आजाराचा प्रसार होत आहे. नुकतेच 1क् दिवसांपूर्वी वेगवेगळ्या देशांचे अहवाल बघता त्यात सुमारे 1711 संशयित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1क्7क् रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी 932 जणांचा मृत्यू झाला असून यातील 5क् पेक्षा जास्त मयत आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर व कर्मचारी आहेत.
या अहवालात अद्याप 641 संशयित रुग्णांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई शहरात नायजेरियातून आलेला एक संशयित असल्याची चर्चा होती. पण, तो साध्या तापाचा रुग्ण असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचा दावा डॉ. कांबळे यांनी केला आहे. पण, सतर्कता म्हणून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रुग्णालयांमध्ये या आजारांचे स्क्रिनिंग सेंटर सुरू केले आहे. याशिवाय, अॅम्ब्युलन्सही सतर्क ठेवण्यात आलेल्या आहेत. ईबोला विषाणू आजार म्हणजे रक्तस्नवजन्य ताप असलेला आजार आहे. अत्यंत घातक असलेल्या या आजाराच्या रुग्णाचे मृत्यूचे प्रमाण सुमारे 9क् टक्के आहे. मनुष्य व प्राण्यांमध्ये व मुख्यत: माकडे व गोरीला यांना हा आजार होऊ शकतो. रुग्णाच्या सहवासात असलेल्यांना रक्ताच्या संपर्काने किंवा इतर स्त्रवांच्या संपर्काने ईबोलाचा संसर्ग होऊ शकतो.
च्जिल्ह्यात सुमारे दीड महिन्यापासून पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी काही ठिकाणी डोके वर काढले आहे. गॅस्ट्रो, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर, गोवर, हिवताप आणि डेंग्यू आदी आजारांनी रुग्ण हैराण असून जिल्ह्यातील सुमारे 878 रुग्णांना या साथीच्या आजारांची लागण झाली आहे.
च्ठाणो महापालिकेसह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि नवी मुंबई आदी महापालिका, अंबरनाथ, बदलापूर, जव्हार, डहाणू आदी पाच नगरपालिका, जिल्हा परिषद आदींच्या कार्यक्षेत्रतील नागरिक साथीच्या आजारांनी हैराण झाले आहेत.
च्परंतु आरोग्य यंत्रणोकडे मात्र जुलैअखेर्पयत केवळ 878 रुग्णांची मागील तीन महिन्यांच्या कालावधीत नोंद आढळून आली आहे. मात्र शहापूर, वाडा, भिवंडी, मुरबाड आदी तालुक्यांमधील बहुतांशी गावपाडय़ांमध्ये कमी-अधिक प्रमाणात जुलाब, ताप, हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांचा समावेश आहे.
च्या साथीच्या आजारांवर तत्काळ उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांतील सर्व रुग्णालयांमध्ये 24 तास सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी केला आहे.
ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी : ग्रामीण भागात साथीचे रुग्ण तुरळक आढळत आहेत. परंतु कोणत्याही गावात मोठय़ा प्रमाणात साथ उद्भवलेली नाही. शहापूरच्या शिवळे येथे विहिरीचे दूषित पाणी प्यायल्यामुळे येथे साथ उद्भवली. पण ती वेळीच आटोक्यात आणली असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव कांबळे यांनी सांगितले. तुरळक आढळून येत असलेल्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आरोग्य पथकांद्वारे तत्काळ उपचार होत आहेत.