शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खा. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेल्या १ लाख वृक्षांची जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 16:28 IST

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांना आग लावण्याचा प्रकार मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी केला.

ठाणे - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातील मांगरूळ येथे लोकसहभागातून लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांना आग लावण्याचा प्रकार मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी केला. या प्रकारात किमान २० हजार झाडांचे नुकसान झाल्याचा वनविभागाचा अंदाज असून या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून प्रकरणाचा कसून तपास करण्याचे निर्देश पोलिस उपायुक्तांना दिले आहेत.

राज्य सरकारच्या वतीने आयोजित वनसप्ताहाचा मुहूर्त साधत खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून एक लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार पाच जुलै २०१७ रोजी विविध क्षेत्रांतल्या तब्बल २० हजार लोकांनी एकत्र येत अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या जागेवर एक लाख झाडे लावण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले होते. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांच्या काळात खा. डॉ. शिंदे यांनी स्वत: या ठिकाणी जातीने लक्ष घातल्यामुळे सुमारे ९५ टक्के झाडे जगली होती. येत्या पाच वर्षांत या ठिकाणी हिरवागार पट्टा तयार करून नैसर्गिक वन तयार करण्याची खा. डॉ. शिंदे यांची योजना होती.

मात्र, स्थानिक समाजकंटकांनी जमिनी बळकावण्याच्या प्रयत्नांतून मंगळवारी रात्री या ठिकाणी वणवा पेटवल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. उल्हासनगर येथील हिललाइन पोलिस ठाण्यात वनविभाग तसेच खा. डॉ. शिंदे यांच्या वतीने संयुक्त तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तातडीने तपास लावून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे. तसेच, जी झाडे जळाली आहेत, त्यांच्या जागी नवी झाडे लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांना या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सहायक पोलिस आयुक्त सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. पलंगे तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेGovernmentसरकार