शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

मिरज पूर्वमध्ये द्राक्षघडांची गळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 04:47 IST

यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे.

संजय माने,टाकळी- यावर्षी झालेल्या सततच्या हवामान बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. मिरज पूर्व भागातील सुमारे आठशे एकरमधील पूर्ण वाढ न झालेले द्राक्ष घड गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोचे नुकसान सहन करावे लागत आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता जास्त होती व त्यानंतर महिनाभर संततधार पाऊस झाल्यामुळे हवामानात अचानक होणाऱ्या बदलाने खरड छाटणीनंतर द्राक्ष काडीमध्ये तयार होणाऱ्या घडांना वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी येणारे द्राक्ष घड कुपोषित राहिले. फळ छाटणीनंतर येणाऱ्या द्राक्षघडांची पूर्ण वाढ न झाल्याने व कुपोषित राहिल्याने ते गळून पडत आहेत. एका वेलीस मार्केटिंगसाठी ५० ते ५५ द्राक्ष घड ठेवले जातात, तर बेदाण्यासाठी ७० ते ८० घड ठेवले जातात. मात्र यावर्षी खरड छाटणीपासून वातावरणात सततच्या होणाऱ्या बदलामुळे घडांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे घड गळून पडत असल्याचे चित्र पूर्व भागातील सुमारे ८०० एकरामध्ये दिसत आहे. द्राक्ष घड गळून पडत असल्याने त्याची संख्या कमी होऊन झाडास केवळ १० ते १५ घड राहात आहेत. केवळ काडी हलवली तरी घड गळून पडत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घड गळून पडू नयेत यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना व औषधांची फवारणी सुरू आहे. मात्र त्याचाही उपयोग होताना दिसत नाही. उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने व सततच्या होणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येमुळे द्राक्ष वेलीची मूळकुज झाल्याने द्राक्ष घडांचे योग्य पोषण झाले नसल्याचे टाकळीतील द्राक्ष बागायतदार संजय पाटील यांनी सांगितले. याबाबत कृषी विभागाकडे योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याने द्राक्षबागायतदार चिंतेत आहे. >द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यतासतत अस्मानी संकटात सापडत असलेल्या द्राक्ष उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता अशा विविध संकटांत शेतकरी सापडत असतो, मात्र द्राक्ष घड गळून पडत असल्याने आणखी एका समस्येची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.