शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, सांगली आणि रत्नागिरीत जाणवले भूकंपाचे धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 08:16 IST

सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

ठळक मुद्देसातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्केपहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेभूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती

सातारा - सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी त्याचा कालावधी जास्त असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. भूकंपानंतर काही नागरिक घराबाहेर आले होते. 

कोयना परिसरापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणेतील जवळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची प्राथमिक माहिती आहे. सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले. साता-यातील कराड भागासह कडेगाव तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. रत्नागिरीच्या देवरुख, संगमेश्वर आणि चिपळूणच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. पण सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले असल्याची माहिती आहे. 

सौम्य धक्के असल्याने सुदैवाने भूकंपात जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे. 

टॅग्स :Earthquakeभूकंप