शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३३ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी शिल्लक; यंत्रणेसमोर आव्हान 

By दिनेश पठाडे | Updated: September 5, 2022 14:43 IST

राज्यातील अद्यापही ३३ लाख ४१ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही. येत्या दोन दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

वाशिम : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवार (दि.५) रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार, राज्यातील अद्यापही ३३ लाख ४१ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही. येत्या दोन दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजाराचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी सुरूवातीला ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर चार वेळेस  मुदत वाढविण्यात आली. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 

राज्यात १ कोटी ६८ लाख ४८ शेतकरी योजनेत सहभागी आहेत. ६८.७१ टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असून ३१.२९ टक्के शेतकऱ्यांची शिल्लक आहे. ई-केवायसी मोहीमेत भंडारा जिल्हा राज्यात अव्वल असून या जिल्ह्यातील १८.२१ टक्के शेतकऱ्यांची केवायसी शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यातील १८.७८ तर वाशिम जिल्ह्यातील १९.२५ टक्के लाभार्थींची केवायसी शिल्लक आहे. हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील ५० टक्के पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे शिल्लक आहे. शिल्लक शेतकऱ्यांच्या टक्केवारीनुसार गुणानुक्रम ठरविण्यात आला आहे. 

७३ लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्णकिसान सन्मान योजनेसाठी पात्र असलेल्या १ कोटी ६८ लाख ४८  शेतकऱ्यांपैकी ७३ लाख ३८ हजार २२२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. ही आकडेवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी प्राप्त अहवालानूसार आहे. यामध्ये उर्वरित दोन दिवसांत आणखी शेतकरी वाढणार आहे. मात्र शिल्लक असलेल्या ३३ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे अशक्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा विचार शासनाला करावा लागणार नसता लाखो शेतकरी किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी