शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळावाही जाणार कोर्टात? शिंदे गटाकडून तयारी; परवानगी न दिल्यास ठाकरे गट याचिका करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 08:43 IST

शिंदे गटाने शिवाजी पार्कवर मेळावा आपणच घेणार, अशी भूमिका घेत तयारी चालविली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाचे काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी शनिवारी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे असतानाच आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळावादेखील कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कारण मेळाव्यास मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली तर उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने याच ठिकाणी मेळावा घेण्याची भूमिका घेतल्याने मेळावा नेमका कोणाचा होणार, ही अनिश्चितता कायम आहे.

शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुंबई महापालिका आम्हालाच परवानगी देईल, असा आमचा विश्वास आहे. परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. मागे शिवाजी पार्कला सायलेन्स झोन म्हणून जाहीर केल्यानंतर शिवसेनेचा मेळावा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तथापि, हा केवळ मेळावा नाही तर पारंपरिक उत्सव असल्याचे मत देत उच्च न्यायालयाने मेळाव्याला परवानगी दिली होती. याची आठवण परब यांनी करून दिली. महापालिकेने परवानगी नाकारली तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पर्याय आमच्यासमोर असेल.

शिंदे गटाने शिवाजी पार्कवर मेळावा आपणच घेणार, अशी भूमिका घेत तयारी चालविली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाचे काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी शनिवारी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘मेळावा आपणच घेणार का,’ असा प्रश्न शिंदे यांना पत्रकारांनी ठाण्यात विचारला असता ते म्हणाले की, अजून वेळ आहे. आता गणेशोत्सव, मग नवरात्र आहे, नंतर बघू.

परवानगी ठाकरे गटाला द्यायची, की शिंदे गटाला यावरून महापालिका संभ्रमात आहे. महापालिकेत सध्या प्रशासक राजवट आहे. त्यामुळे एकप्रकारे राज्य सरकारचेच नियंत्रण आहे. त्यामुळे शिंदे गटाला परवानगी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. लगेच निर्णय घेण्याऐवजी ठाकरे गटाला दबावात ठेवण्याची शिंदे गटाकडून खेळली जात असल्याचे समजते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना शिवाजी पार्कवर ठाकरे यांचाच मेळावा व्हायला हवा, असे सांगितले. दोघांनाही मेळावा घेण्याचा अधिकार आहे. परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते निर्णय घेत असतात, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचा शिंदेंना सल्लाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘वाद न घालता मुख्यमंत्र्यांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा’, असा सल्ला एकनाथ शिंदे यांना दिला आहे. सभा, मेळावे घेण्याचा अधिकार प्रत्येकच राजकीय पक्षाला आहे त्यामुळे सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाCourtन्यायालय