शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मेळावा; सणांत वाद नको म्हणून शिंदे गटाने शिवाजी पार्कवरील दावा सोडला! ठाकरे गटाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 07:04 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई :  दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अधिकृतरीत्या मागे घेतला आहे. तसे रीतसर पत्र आमदार सदा सरवणकर यांनी जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अर्ज मागे घेतल्याने एकप्रकारे महापालिकेची डोकेदुखी संपली आहे. 

शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार?दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान किंवा क्रॉस मैदान मिळण्यासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली.

महापालिकेवरील दडपण दूर- शिंदे यांच्या गटाने १ आणि ७ ऑगस्ट रोजी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत पालिकेकडे अर्ज केला होता.  - यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने पालिकेकडे अर्ज केला होता. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी शिवाजी पार्क मैदानावरून दोन्ही गटांत संघर्ष पेटला होता आणि नेहमीप्रमाणे पालिकेची अडचण झाली होती. 

- पालिकेने कोणत्याच अर्जावर निर्णय घेतला नव्हता. सोमवारी ठाकरे गटाचे अनिल परब यांनी सहायक आयुक्तांची भेट घेऊन परवानगीचे काय झाले, अशी विचारणा केली होती. शिंदे गटाने शिवाजी पार्कऐवजी दुसऱ्या मैदानासाठी अर्ज केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी दिले होते.

टॅग्स :DasaraदसराShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे