शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Navratri: दुर्गेच्या जागरात यंदा नवरात्री नव्हे दहा रात्री; दसरा अकराव्या दिवशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:43 IST

गरबा, दांडियाला चढणार रंग

कोल्हापूर : महिषासूर मर्दिनी, आदिशक्ती, दुर्गेचा जागर करणारा नवरात्रोत्सव यंदा नऊ रात्री नव्हे तर दहा रात्री असणार आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या याकाळात तिथीची वृद्धी झाली असून, अकराव्या दिवशी दसरा आहे. त्यामुळे देवीच्या जागरासाठी, गरबा-दांडियासाठी आणखी एक दिवस मिळणार आहे.असुरांचा संहार करणाऱ्या, स्त्रीशक्तीची प्रचिती देणारा नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा जागर. वर्षभरातील सर्व सणावारांमध्ये तसा हा कडक आणि कठोर उपासनेचा, काटेकोर धार्मिक विधींचा उत्सव. देवीचा महिषासुराशी युद्ध सुरू झालेल्या दिवशी घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, अष्टमीला देवीने राक्षसाचा वध केला. खंडेनवमीला शस्त्रांची पूजा आणि देवीच्या विजयोत्सवाचा जल्लोष म्हणजे दसरा असा हा उत्सव. ९ ते दहा दिवसांचा उत्सव. यंदा मात्र त्यात एक दिवस तिथीची वृद्धी आली आहे. त्यामुळे यंदाच्या नवराेत्सवात दहा रात्री असणार आहेत. अकराव्या दिवशी दसरा आहे.

वाचा : पैसे नाहीत हातात अन् म्हणे दसरा महोत्सव करा थाटात

गरबा, दांडियाचा उत्साहनवरात्रोत्सवात ठिकठिकाणी गरबा दांडियाचे कार्यक्रम होतात. विशेषत: गुजराती, मारवाडी समाजबांधव त्यांच्या पारंपरिक गीतांवर अगदी लयबद्धपणे नृत्य करतात. यासह इव्हेंट मॅनेजमेंट संस्था, महिला मंडळ, तरुण मंडळांच्या वतीनेदेखील याचे आयोजन केले जाते. यंदा एक दिवस जास्तीचा मिळणार आहे.

असा आहे नवरात्रोत्सव

  • घटस्थापना : २२ सप्टेंबर
  • ललिता पंचमी (अंबाबाई-त्रयंबोली देवी भेट) : २७ सप्टेंबर
  • जोतिर्लिंग जागर (जोतिबा डोंगर) : २९ सप्टेंबर
  • अष्टमीचा जागर, अंबाबाईची नगरप्रदक्षिणा : ३० सप्टेंबर
  • खंडेनवमी : १ ऑक्टोबर
  • विजयादशमी, दसरा : २ ऑक्टोबर