शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डुंगीपाड्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पाडकाम

By admin | Updated: May 21, 2016 04:04 IST

सरकारी व आदिवासी जमीनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणा विरोधातीलआली मोहीम शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ही तिव्र केली

पालघर : पालघर नगरपरिषदेने सरकारी व आदिवासी जमीनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणा विरोधातीलआली मोहीम शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ही तिव्र केली आहे. डुंगीपाडयातील सुमारे दिडचशेच्यावर चाळीतील रूम जमीनदोस्त करण्यात आले. मागील दोन वर्षापासून नगरपरिषद हद्दीत अतिक्रमणे जोरात वाढत असताना त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या नगर पालिकेने उच्चन्यायालयाच्या आदेशानंतर या कारवाया सुरू केल्या आहेत.पालघर नगरपरिषद हद्दीतील डुंगीपाडा येथील आदिवासींच्या जमीनीवर बेकायेदेशीरपणे उभारलेल्या सात चाळीमधील खोल्यावर नगरपरिषदेने गुरुवारी बुलडोझर फिरविल्यानंतर सेंटजॉर्ज कॉलेजच्या मागे उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी फिरवून तेथील साधारणपणे दोनशे खोल्या जमीदोस्त करण्यात आल्याची माहीती नगरपरिषद प्रशासनाने दिली. गुरुवारी डुंगीपाडयामध्ये गरीबांच्या बांधकामावर कुठलीही पुर्व कल्पना न देता कारवाई करण्यात आल्याने सामान बाहेर काढण्याची संधीही काहिंना मिळाली नव्हती. यावेळी सर्वत्र एकच आक्रोश रडारड, पळापळ सुरू होती. यावेळी कारवाई करताना आमची घरे जर अनधिकृत असती तर नगरपरिषद प्रशासनाने ती बांधण्यापूर्वीच कारवाई करायला हवी होती. यावर त्यांनी दहा हजार रूपये स्विकारून अनधिकृतपणाचा शिक्का, घरपट्टीच्या पावतीवर देऊन या अनधिकृत बांधकामान एकाप्रकारे पाठबळच दिल्याच्या प्रतिक्रया या वेळी लोकामधुन उमटत होत्या. यावेळी आपल्या घरावर कारवाई होत असेत तर सेंट जॉर्ज कॉलेजच्या मागे असलेल्या चाळीवर कारवाई करण्याची मागणी मान्य करुन नगरपरिषदेने गुरुवारी संध्याकाळी त्या चाळीही जमीनदोस्त केल्या.गुरुवारी झालेल्या कारवाई दरम्यान, पोलीसांनी हुज्जत घालुन दगडफेक करण्याच्या पावित्र्यात उभ्या असलेल्या जमावाला पांगवुन तीघांना ताब्यात घेतले होते. शुक्रवारी पुन्हा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डुंगीपाडयातील सुमारे दिडशे खोल्या सहा जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आल्या यावेळी पालघर पोलीस स्टशनचे प्रभारी अधिकारी दिपक साहुंखे, अजय जगताप यांच्यासह शेकडो पोलीस व दंगलग्रस्त नियंत्रण पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)>जिल्हाधिकाऱ्यांना नागरिक ांचा सवाल या कारवाईमध्ये पाणीपुरी, वडापाव, भाजीपाला विक्रेते, कारखान्यातील कामगार यांनी आयुष्यभरची कमाई लाऊन घेतलेली घरे कोसळत असतांना होणारा आक्रोश मन सुन्न करीत होता. एका ठिकाणी ही घरे अनधिकृत बांधकामे ठरवून तोडली जात असताना ज्यांच्या आशिर्वादाने ही अनधिकृत बांधकामे राजरोजपणे उभी आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी बांगर दाखवणार आहेत काय? असा सवाल होत आहे.