शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचा वापर ठरतेय घटस्फोटाचे कारण

By admin | Updated: April 30, 2015 00:21 IST

सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. घोळक्यात असतानाही माणसे अनेकदा मोबाईलवरच लक्ष खिळवून असतात.

पुणे : सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. घोळक्यात असतानाही माणसे अनेकदा मोबाईलवरच लक्ष खिळवून असतात. अशा परिस्थितीत पती-पत्नींच्या नाजूक नात्यांवर छोटेखानी मोबाईल भारी पडत आहे. सातत्याने मोबाइलवरून बोलणे, व्हॉट्स अ‍ॅपवरून चॅटिंग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसमजूती, विसंवाद आणि वाढणारा संशय हे पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. कौटुंबिक न्यायालय आणि महिला तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या तक्रारी आणि दावे यावरून ही गोष्ट समोर आली आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या एकूण दाव्यांपैकी ४० टक्के वादाचे कारण मोबाइल असल्याचे आढळून आले आहे.आजच्या जमान्यात बहुतेक गोष्टींसाठी मोबाईलचा कॉल नव्हे तर एका मिसकॉलवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे मोबाइल ही प्रत्येकाची गरज झाली आहे. अगदी सामान्यांच्या हातात हे यंत्र चपखलपणे बसले आहे. कामावर जाताना, एखाद्या दिवशी मोबाइल घरी विसरला की व्यक्ती अस्वस्थ होतो. आता स्मार्ट फोनचा व इंटरनेटचा जमाना आला आहे. त्यामुळे मोबाइलवरून संभाषणाबरोबरच व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग ही सर्रास गोष्ट झाली आहे. पण, हाच मोबाइल आता पती-पत्नीच्या वादाचे मोठे करण ठरू लागला आहे. केवळ उच्च शिक्षित किंवा मध्यमवर्गीय दाम्पत्यांमध्येच नव्हे, तर अशिक्षित वर्गातील पती-पत्नींमधील वादातही मोबाइल कारणीभूत ठरत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. पती-पत्नीमध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद झाल्यानंतर ते दोघांमध्येच मिटणे आवश्यक असते. पण, किरकोळ व खासगी गोष्टीदेखील मुलीच्या माहेरी, बाहेरगावी असणाऱ्या दाम्पत्यांच्या घरी मोबाइलवरून लगेच समजतात. त्यामुळे लगेचच जावयाला/सूनेला फोन करून विचारणा केली जाते. यातून पुन्हा त्यांच्यात वाद होतात. त्यामुळे आशा दाव्यात समुपदेश ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. (प्रतिनिधी)४याबाबत कौटुंबिक दाव्यांमध्ये काम करणाऱ्या वकील सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, की कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या ४० टक्के दाव्यांत मोबाइल हे वादाचे कारण असल्याचे दिसून आले आहे. ४मोबाइलमुळे लोक लवकर जवळ येतात. त्यामुळे नको त्या गोष्टी घडत असतात. पती किंवा पत्नीचे बराच वेळ दुसऱ्याशी फोनवर बोलणे. रात्री उशिरापर्यंत व्हॉट्स अ‍ॅपवरून चॅटिंग करणे. ४या गोष्टींतून दोघांमध्ये विसंवाद वाढत जातो. संशय निर्माण झाल्यामुळे एकमेकांचे मॅसेज, चॅटिंग पाहिले जातात. अशी विविध कारणे पती-पत्नीच्या वादाची आढळून आली आहेत. ४पती किंवा पत्नी गुपचूप कोणाशी तरी चॅटिंग करते, याचा संशय आल्यानंतर मोबाइलची तपासणी होते व काही आक्षेपार्ह सापडल्यास वाद वाढत जातात. ४अशा प्रकारचे विविध दावे सध्या न्यायालयात सुरू आहेत. घटस्फोट घेणे ही पूर्वी भीती वाटण्याची गोष्ट होती. पण आता ही सहज गोष्ट मानली जाते. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण ही वाढले आहे.