शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; खात्यावरून तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 07:46 IST

मुख्यमंत्र्यांकडे आमदारांची नाराजी, राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन करताना अगदी सुरुवातीला जे शिवसेना आमदार शिंदे यांच्यासोबत गेले त्यांनाच मंत्रिपदापासून वंचित राहावे लागल्याने अस्वस्थतेत भर पडली आहे

यदु जोशी  मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करू नका असा दबाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिंदे समर्थक आमदारांनी वाढविला आहे. विस्तारावरून शिंदे गट खूपच आक्रमक झाला असून या गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातच राष्ट्रवादीने मलाईदार खात्यांचा आग्रह धरल्याने अस्वस्थतेत भर पडली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन करताना अगदी सुरुवातीला जे शिवसेना आमदार शिंदे यांच्यासोबत गेले त्यांनाच मंत्रिपदापासून वंचित राहावे लागल्याने अस्वस्थतेत भर पडली आहे. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना आधी खातेवाटप करावे आणि नंतर विस्तार करावा असे ठरत असल्याची कुणकुण लागताच अत्यंत आक्रमक झालेल्या शिंदे गटातील आमदारांनी नाराजीचे स्पष्ट सूर लावले आहेत. आधी राष्ट्रवादीला खातेवाटप अजिबात करू नका आणि करतच असाल तर ते मागतील ती खाती अजिबात देऊ नका अशी गळ या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातली आहे. आपण भाजपसोबत मित्र म्हणून गेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकीय सोईसाठी सोबत आला आहे, त्यांना आताच वजनदार खाती दिली तर ते पुढे सगळ्यांना दबावात ठेवतील अशी भावना शिवसेनेच्या किमान सहा ज्येष्ठ आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली असल्याचे समजते. 

तिढा नेमका कशामुळे?  राष्ट्रवादीने अर्थ, ग्रामविकास, ऊर्जा, परिवहन, जलसंपदा, महिला बालकल्याण अशा महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला आहे. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतरही खातेवाटप जाहीर होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादीला वजनदार खाती द्यायची अन् मग विस्तार करून आपल्या मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती द्यायची हे शिंदे यांना मान्य नसल्याचे समजते. विशिष्ट खाती देण्यासाठीचा राष्ट्रवादीचा दबाव झुगारून देण्याची भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याने आता चेंडू दिल्लीच्या कोर्टात आहे. तर भाजपकडील काही वजनदार खाती राष्ट्रवादीला देण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध दर्शविल्याने तिढा कायम आहे, असेही सूत्रांनी सांगितले.  

तीन पक्षांची लवकरच समितीभाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांनी एकमेकांवर टीका करण्याचे प्रकार घडू लागल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच तीन पक्षांची समन्वय समिती नेमली जाण्याची शक्यता आहे. वादाचे विषय या समितीमध्ये आधी चर्चिले जातील व त्यावर शिंदे-फडणवीस- पवार यांचा निर्णय अंतिम असेल.

विस्तारही रखडलाएकीकडे खातेवाटप रखडलेले असताना मंत्रीमंडळ विस्तारही रखडला आहे. मागील दोन आठवड्यांपासून मंत्रीमंडळ विस्तार एक-दोन दिवसात होणार अशी चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार त्याबद्दल जाहीरपणे भाष्यही करत आहेत. मात्र मंत्रीमंडळ विस्तार काही होत नाही. आता शनिवार किंवा रविवारी मंत्रीमंडळ विस्तार होईल अशी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना