शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

पावसामुळे रस्त्यांचे पितळ उघडे

By admin | Updated: September 19, 2016 01:26 IST

गणपती विसर्जनाच्या दिवशी भोसरीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

पिंपरी : गणपती विसर्जनाच्या दिवशी भोसरीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पण गेले तीन दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे महापालिकेच्या रस्त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. कारण गणेशोत्सवापूर्वी भरण्यात आलेले खड्डे पूर्ववत उघडे पडले असून, येथील पिंपरी, नाशिक महामार्ग, तसेच इतर अंतर्गत रस्त्यांवर ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ अशी अवस्था झालेली दिसून येते आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत असून, अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. हे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दर वर्षी पावसाळ्यात नेहमीच्या ठिकाणीच खड्डे होतात. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचा घाट घातला जातो, तो केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठीच. कारण रस्त्यांची ही मलमपट्टी जास्त दिवस टिकत नाही. तसेच खड्ड्यातील वाळू इतरत्र पसरून दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाल्याच्या कित्येक घटना या भागात घडल्या आहेत. डांबरीकरणाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांचे समाधान करण्याचा निष्फळ प्रयत्न दर वर्षी केला जातो. पण नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही. मुख्य रस्त्यांची ही अवस्था असेल, तर अंतर्गत रस्त्यांचे काय? पिंपरी एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची तर दैना झाली आहे. या रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहेत, तर रात्री-अपरात्री खड्डे न दिसल्याने बरेच अपघात होत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे त्यातून एखादे वाहन गेले, तर या खड्ड्यांतील पाणी बाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. औद्योगिक क्षेत्रात देश-परदेशातील उद्योजक भेट देतात. त्यांनाही रस्त्याच्या दुरवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत, तसेच हे खड्डे बुजवण्यासाठी चांगल्या दर्जाचे डांबर वापरावे, अशी मागणी वाहनचालक, नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)