शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांच्या गर्भवतीला डांबले पोलीस ठाण्यात, गुडमॉर्निंग पथकाची अजब कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:31 IST

हगणदरीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांकडून काही ठिकाणी अरेरावी आणि आतताईपणा होत असल्याचे प्रकार हल्ली उघडकीस येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार मेडशी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

अनिस बागवानमेडशी (वाशिम): हगणदरीमुक्तीसाठी गठीत करण्यात आलेल्या गुडमॉर्निंग पथकांकडून काही ठिकाणी अरेरावी आणि आतताईपणा होत असल्याचे प्रकार हल्ली उघडकीस येत आहेत. असाच एक गंभीर प्रकार मेडशी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. माणुसकी हरविलेल्या गुडमॉर्निंग पथकातील कर्मचा-यांनी रस्त्यावर फेरफटका मारत असलेल्या एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीला कुठलीच हयगय न करता वाहनात टाकून पोलीस चौकीत जमा केले. यादरम्यान तिला असह्य त्रास सुरू झाल्याने तिची तडकाफडकी अकोला येथे उपचारासाठी रवानगी करावी लागली. जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावोगावी उघड्यावर जाणा-यांना पोलीस चौकीत आणून त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही बाब स्वच्छता राखण्यात बहुतांशी फलदायी ठरत असली तरी यादरम्यान गुडमॉर्निंग पथकाने परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र, पथकातील निर्ढावलेल्या काही कर्मचा-यांकडून माणुसकी पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. मेडशी येथे सकाळी एक नऊ महिन्याची गर्भवती महिला नित्यनेमानं गावकुसातील रस्त्यावर फेरफटका मारण्यानिमित्त घराबाहेर पडली.रस्त्यावर शतपावली करीत असताना नेमक्या त्याचवेळी गुडमॉर्निंग पथकाचे वाहन त्याठिकाणी धडकले. कुठलीही वास्तपूस्त अथवा शहानिशा न करता पथकातील कर्मचा-यांनी सदर महिलेला वाहनात टाकून पोलीस चौकीत आणले. यादरम्यान आदळआपट झाल्याने गर्भवती महिलेस त्रास सुरू झाला. त्यामुळे तिच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अकोला येथे पुढील उपचाराकरिता रवानगी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी दिल्यामुळे गावच्या ग्रामसेवकासह गुडमॉर्निंग पथकातील कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.