शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

महाद्वार काल्याने पंढरपुरातील आषाढी वारीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 14:51 IST

दहीहंडी फोडून भाविकांना वाटला प्रसाद; ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीकडे रवाना 

ठळक मुद्देकाल्याचे मानकरी असणाºया ह. भ. प. मदन महाराज हरिदास यांनी खांद्यावर पादुका घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्याअनिल महाराज हरिदास यांनी काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडली व हंडीतील काला भाविकांना वाटलामंदिरातून हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदीवर गेला येथे नदीचे पाणी पादुकांवर अर्पण

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या सभामंडपात कुंकू बुक्क्यासह लाह्यांची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाव्दार काल्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. खºया अर्थाने या काल्याने आता आषाढी यात्रेची सांगता झाली.  दरम्यान, मंगळवारी ग्रहणामुळे मुक्कामी असलेली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज महाद्वार काल्यानंतर आळंदीकडे रवाना झाली.

पंढरीत अनेक संतांच्या विविध परंपरा असून यामध्ये महाद्वार काल्याचाही समावेश आहे. येथील हरिदास घराण्यात जवळपास ४०० वर्षांपूर्वी संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या घराण्यात या खडावा डोक्यावर घेऊन काला करण्याची परंपरा आहे. 

सभामंडप येथे काल्याचे मानकरी असणाºया ह. भ. प. मदन महाराज हरिदास यांनी खांद्यावर पादुका घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यानंतर अनिल महाराज हरिदास यांनी काल्याचा अभंग म्हणून दहीहंडी फोडली व हंडीतील काला भाविकांना वाटला. मंदिरातून हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदीवर गेला येथे नदीचे पाणी पादुकांवर अर्पण केले. यानंतर कुंभार घाटमार्गे माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे दहीहंडी फोडून हा सोहळा वाड्यात विसावला. येथे येणाºया हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. महाव्दार काल्यानंतर खºया अर्थाने आषाढी वारीची सांगता झाली. या काल्यासाठी शेकडो वारकरी पंढरीत थांबले होते.

पालखी सोहळा आळंदीकडे रवानाज्ञानेश्वर मंदिरातून आषाढी यात्रेचा सोहळा पार पाडून कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सजविलेला रथ  बुधवारी दुपारी चार वाजता श्री क्षेत्र आळंदीकडे रवाना झाला.  गोपाळपूरचा गोपाळकाला झाल्यानंतर सर्व संतांचे पालखी सोहळे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. गेल्यावर्षी आणि यंदा असे सलग दोन वर्षे पौर्णिमेला गोपाळकाल्यादिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे यंदाही माउलींच्या पालखीचा पंढरपुरातील मुक्काम वाढला होता. बुधवारी दुपारी ४ वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. सोबत २ हजार वारकºयांसह वीणेकरी, पखवाज, तुळशीवाले, हंडेवाले व दिंड्या सहभागी झाल्या होत्या़ पहिला मुक्काम वाखरी येथे होणार आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविक रांग करून शिस्तीने दर्शन घेत होते़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा