शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पुरावे भस्मसात झाल्यामुळे चौकशीत अडथळा

By admin | Updated: May 12, 2015 02:30 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार गोकूळ निवासमधील आगीच्या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली खरी़

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार गोकूळ निवासमधील आगीच्या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली खरी़ परंतु ही चार मजली इमारत आगीत खाक होऊन कोसळल्यामुळे पुरावेच नष्ट झाले आहेत़ त्याचा परिणाम चौकशीवर होणार असून, प्राथमिक अहवाल तयार करण्यास तीन दिवस लोटणार आहेत़अग्निशमन दलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज घटनास्थळाची छाननी केली़ मात्र ही इमारत संपूर्णत: कोसळल्यामुळे त्या ठिकाणी फक्त मातीचा ढिगाराच उरला होता़ हा ढिगाराही स्थानिक विभाग कार्यालयाने उपसून काढला आहे़ त्यामुळे प्रथमदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच चौकशी करावी लागेल, अशी भीती अधिकारी व्यक्त करीत आहेत़ इमारतीमधील मीटर बॉक्स आणि एलपीजी सिलिंडर्सचा बेकायदा साठा, कपडे, ज्वलनशील रसायन आणि मोबाइल बॅटरीमुळे आग वाढल्याचा अंदाज आहे़ अन्य दुर्घटनांमध्ये आग विझल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आगीचा अचूक अंदाज बांधता येत असतो़ मात्र या घटनेत इमारतच कोसळल्यामुळे या घटनेचे साक्षीदार असलेल्या लोकांच्या जबाबानुसार चौकशी करावी लागणार असल्याचे समजते़ याबाबत विचारले असता, या दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यास तीन दिवस लागतील, असे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी स्पष्ट केले़ धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरधोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची तपासणी, फायर आॅडिट, स्ट्रक्चरल आॅडिट एका महिन्यात करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत़ फायर हायड्रट पुनर्जीवित करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)