शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

डिजिटायझेशनमुळे महिन्याकाठी ३८ हजार मेट्रिक टन धान्याची बचत - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:55 AM

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केलेल्या डिजिटायझेशनमुळे महिन्याकाठी ३८ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली असून कोणताही अतिरिक्त खर्च न करता हेच धान्य इतर घटकांतील गरजूंना वितरित करणे शक्य झाले आहे

मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केलेल्या डिजिटायझेशनमुळे महिन्याकाठी ३८ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली असून कोणताही अतिरिक्त खर्च न करता हेच धान्य इतर घटकांतील गरजूंना वितरित करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या दुसºया भागात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून नागरिकांचे ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएसद्वारे आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासन पारदर्शक आणि गतिमान बनते आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या डिजिटायझेशनमुळे मोठी बचत होत असून योग्य व्यक्तींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचत आहे. सध्या राज्यात अडीच कोटी रेशनकार्ड डिजिटल झाली आहेत. आधार लिंकिंगमुळे सुमारे दहा लाख शिधापत्रिका कमी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.शिवाय, राज्यात उद्योग सुरू करताना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी ‘मैत्री’ हे वेब-पोर्टल उपयोगी ठरत आहे. सोळा विभागांच्या एकत्रित परवानग्या देण्यासाठी ४१ नोडल अधिकारी काम करत असून ८०० पेक्षा जास्त उद्योगांच्या अडचणींचे आॅनलाइन पद्धतीने निराकरण केले आहे. जात प्रमाणपत्र आॅनलाइन देण्याची प्रक्रिया सुरू असून जातपडताळणीची प्रक्रिया लवकरच आॅनलाइन करण्यात येणार आहे. तसेच जातपडताळणीसाठी प्रशासनावर कालावधीचे बंधन घालण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सातबारा संगणकीकरणाचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड हे तीन जिल्हे वगळता इतर ठिकाणी आॅक्टोबरपासून आॅनलाइन सातबारा देण्यास सुरुवात होईल. या तीन जिल्ह्यांत डिसेंबरपर्यंत सातबारा संगणकीकरण पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस