शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीयांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:44 IST

घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.‘बी१२’ या जीवनसत्त्वाच्या माध्यमातून चेतापेशी आणि रक्तपेशींची निर्मिती करण्यात येते. मेंदू, रोगप्रतिकारक क्षमता आणि चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते. एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, १५ टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्येत जीवनसत्त्व ‘बी१२’ची कमतरता असते. आश्चर्याची बाब म्हणजे लिंगआधारे केलेल्या विश्लेषणात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ‘बी१२’चा अभाव अधिक दिसून येतो आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला पूरक आहार घेत असल्याने त्यांचे शरीर ‘बी१२’ची पातळी राखते.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करावेत. गरजेनुसार पूरक आहार घ्यावा. एखाद्याला आपल्या शरीरातील ‘बी१२’ अभावाची तपासणी करायची असल्यास डॉक्टर सहज निदान करू शकतात. तसेच पूरक आहार किंवा इंजेक्शनदेखील सुचवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनसत्व ‘बी१२’ची कमतरता आणि संबंधित लक्षणांची तपासणी सर्वसाधारण चिकित्सकाकडे करून घेणे उत्तम ठरते.‘जीवनसत्त्व बी १२’च्या अभावाची कारणेअ‍ॅट्रोफिक गॅस्ट्राइटीसमुळे पोटातील अंतर्गत अस्तर पातळ होतंगंभीर स्वरूपाच्या रक्ताक्षय, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार होतातक्रोनज डीसीज, सेलीयाक डीसीज किंवा जीवाणूंची वाढ झाल्याने छोट्या आतड्याच्या सुरळीत कार्यवहनात अडथळा आल्याने जाणवणारा अशक्तपणावाढत्या वयासोबत जीवनसत्त्व ‘बी१२’ शोषण्याची शरीराची शक्ती संपून जाते. जर एखाद्याने वजन कमी करण्याची वा पोटाची शस्त्रक्रिया केली असल्यास हे कठीण होऊन जाते. मद्यपान मोठ्या प्रमाणावर करत असल्यास किंवा बराच काळ अ‍ॅसिड कमी करणारे औषध घेत असल्यास हे जीवनसत्त्व शोषण्यास शरीराला अडथळे निर्माण होतात.- डॉ. कीर्ती चढ्ढा।शहर ‘बी१२’चाअभावअहमदाबाद २७.९४दिल्ली २६.५८पुणे २२.६६कोलकाता २०.७३मुंबई १९.८४कोचीन ९.१८