शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जलयुक्त शिवार अभियानामुळे होणार दुष्काळ निवारण -डॉ.राजेंद्र सिंह

By admin | Updated: July 11, 2016 18:47 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी प्रदेश अधिक पावसाच्या प्रदेशात रुपांतरीत करणे शक्य आहे

ऑनलाइन लोकमतकारंजा लाड, दि. 11- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी प्रदेश अधिक पावसाच्या प्रदेशात रुपांतरीत करणे शक्य आहे. ही योजना निराशेला आशेत बदलण्याचा कार्यक्रम असून राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान प्रशंसनीय आहे.या योजनेमध्ये भ्रष्टाचार न होण्यासाठी ही कामे काँट्रॅकटरला न देता लोकसहभागातून झाली पाहिजे असे मत जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी तालुक्यातील भामदेवी व शहरातील सारंग तलावाच्या जल संधारणांच्या कामांचे अवलोकन व जलपूजन कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कारंजा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी शरद जावडे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, कृषी अधिकारी समाधान धुळधुले , परिविक्षाधीन तहसीलदार रमेश जेंशवंत , डॉ.निलेश हेडा आदींची उपस्थित होते. राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, जलसंरचनेवर अतिक्रमण, नद्यांचे प्रदुषण, भूजलाचा पुनर्भरणापेक्षा अधिक प्रमाणात वापर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे विवाद या आजच्या प्रमुख समस्या आहेत.

या समस्यांच्या निराकरणासाठी जलसाक्षरतेच्या माध्यमातून नदी प्रदूषण टाळणे आणि जलसंरचना ओळखून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. जलक्रांती घडविण्याची क्षमता प्रत्येकात आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या क्षमतेचा जाणिवेने वापर करून गावातील पाणी समस्या दूर करावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक सरपंच, पोलीस पाटील आदींसह नागरिकांची बहुसंख्येमध्ये उपस्थिती होती. कार्यक्रमाचा संचालन मंडळ अधिकारी देवानंद कटके यांनी केले. तर आभार तलाठी देवेंद्र मुकुंद यांनी मानले.