शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागाची केंद्रीय दुष्काळी पथकांकडून पाहणी

By admin | Updated: June 2, 2016 21:50 IST

जिल्ह्यातील दुष्काळी भागाची गुरुवारी केंद्रीय पथकाने पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 2-  जिल्ह्यातील दुष्काळी भागाची गुरुवारी केंद्रीय पथकाने पाहणी करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. गुरुवारी केंद्रीय पथकाने अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस आदी भागातील दुष्काळी भागाची पाहणी केली़. यावेळी बंद पडलेले पाणीपुरवठा स्रोत, जळालेल्या बागा, कोरडा पडलेला धुबधुबी प्रकल्प, पडीक पडलेल्या जमिनी पाहताच दुष्काळी दाहकतेची खात्री या पथकाला पटली. यामध्ये पाच जणांचा समावेश होता.यामध्ये राणी कुमोदिनी, आर. के. सिंग, एच. आर. खन्ना, पी. के. मिश्रा, जी. आर. झरगर, जिल्हाधिकारी रणजित कुमार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांचा समावेश होता. या पथकाने खालावलेली पाण्याची पातळी, टँकरचा आढावा, जलयुक्त शिवारातून झालेली कामे यासह गावाच्या चारही शिवारातील दुष्काळाची पाहणी त्यांनी केली. पथकाला माजी आ. महादेवराव पाटील, माजी उपसभापती मल्लिकार्जुन पाटील, सरपंच डॉ. विठ्ठल राठोड व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. भाजपाचे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, राजशेखर मसुती, आनंद खजुरगीकर यांनी मदतीसाठी निवेदन दिले. इंगळगीमार्गे शिरवळ परत जेऊर या पाहणी दौऱ्यात त्यांना सगळीकडे उजाड माळरानच दिसले. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती व पायपीटही या पथकाने पाहिली. चंद्रकांत पाटील यांच्या जळालेल्या द्राक्ष व इतर बागांची पाहणी करून श्रीमंत झंपा यांच्या मुळासकट जळालेल्या पेरुची बागही त्यांनी पाहिली.

अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील निरीक्षणावरून काहीच सांगू शकत नाही. याचा एकत्रित अहवाल सादर करणार असून, मदतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत.- राणी कुमोदिनी, प्रमुख, केंद्रीय दुष्काळी पाहणी पथकतालुक्यात कंपार्टमेंट बंडिंग व जलयुक्त शिवाराच्या कामावर भर द्या. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला पाहिजे. नुकसानीचा अंदाज घेतला. शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे, याची कल्पना आली आहे.- आर. के. सिंग, सदस्य, केंद्रीय दुष्काळी पाहणी पथक