शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

 ३३ कोटी वृक्षलागवडीचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्रॉफी, १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:28 IST

राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे.

- गणेश वासनिक अमरावती - राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे. ही सर्व माहिती वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा बिगूल वाजला. ही वृक्षलागवड जनचळवळ होण्याच्या अनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहे. प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे यांनी राज्यात सर्वच विभागात बैठका घेऊन वृक्षलागवडीचे नियोजन चालविले आहे. वनविभाग, सामाजिक वनिकरण आणि इतर शासकीय, प्रशासकीय ४६ यंत्रणांच्या सहकार्याने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास जाणार आहे. त्याकरिता ३३ जिल्हानिहाय वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडे या मोहिमेची विशेषत्ववाने धुरा सोपविली आहे. रोपे जगविणे, रोपांची आॅनलाईन मागणी नोंदविणे, यंत्रणेला रोपे पुरविणे, वृक्षलागवडीसाठी जागेची तरतूद करणे आदी बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यावेळी रेशीम उद्योग विभागाच्या जागेवर वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे.  आमदार, खासदारांवर रोपे जगविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी वनविभागाने जोरदार तयारी चालविली आहे. दुष्काळी भागात यापूर्वीच्या १३ कोटी वृक्ष लागवडीत झाडे जगविण्याची जबाबदारी आमदार, खासदारांवर सोपविली जाणार आहे. येत्या उन्हाळ्यात वृक्ष जगविणे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील वृक्षलागवडीतील रोपे, वृक्षांना पाणी स्त्रोत कायम ठेवण्यासाठी आमदार, खासदारांना निधी द्यावा लागणार आहे. तसे बंधन शासनाने घातले आहे.   राज्यात असे असेल वृक्षलागवडीचे 'टार्गेट'अमरावती-४२,३६,९००, अकोला-२८,९६,५००, वाशिम-२२,८३,५००, यवतमाळ-५८,६४,८५०, बुलडाणा-३९,९८,१५०, नाशिक-६४,९६,०५०, अहमदनगर-५५,६३,८५०, धुळे-२४,७६,१००, जळगाव-५३,४३,१००, नंदूरबार- २४,४४,७००, रत्नागिरी-३७,६२,९००, सिंधुदुर्ग- २३,५८,९००, रायगड-४१,४३,३००, पालघर-२८,२०,९५०, मुंबई सिटी-१,३६,२००, पुणे- ७६,०२,८००, सोलापूर-५४,३२,३५०, सातारा-६३,७६,७५०, सांगली-४५,०१,३५०, कोल्हापूर-५१,४०,४००, औरंगाबाद-५७,९५,४५०, जालना-६४,८४,४५०, बीड-५७,६०,३५०, परभणी-६४,८५,७५०, हिंगोली-३१,०८,७००, लातूर-६,२२,८५०, नांदेड-५८,५४,४००, नागपूर-५०,९६,३००, वर्धा- ५७,६२,२००, गोंदिया-३१,८१,२५०, चंद्रपूर-५७,०२,३५०, गडचिरोली-२१,८५,९००, भंडारा- २४,४३,८०० असा 'टार्गेट' देण्यात आला आहे.       ३३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने तयारी आरंभली आहे. दुष्काळी भागात वृक्ष जगविणे मोठे आव्हान आहे. तथापि, खासदार, आमदारांना रोपे आणि वृक्षांना पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी निधीची मागणी वजा विनंती केली जाईल.  - प्रवीण चव्हाण,   मुख्य वनसंरक्षक, अमरावती वनवृत्त (प्रादेशिक)

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार