शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्य विभागाला कागदोपत्रीच पुरविले वाहनचालक; शासनाची फसवणूक, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 08:28 IST

Mumbai News: सार्वजनिक आरोग्य विभागाचे रुग्णवाहिका वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी नाशिक येथील यशोधरा महिला औद्योगिक उत्पादन संस्था आणि पालघरच्या राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेने बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात या संस्थांच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

 मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाचे रुग्णवाहिका वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी नाशिक येथील यशोधरा महिला औद्योगिक उत्पादन संस्था आणि पालघरच्या राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेने बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात या संस्थांच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

या संबंधीची निविदा २० जुलै २०२१ रोजी काढण्यात आली होती. पूर्ण राज्यात वाहनचालक पुरविण्यासाठी १८ संस्थांना कंत्राट देण्यात आले होते. संबंधित संस्थांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार रूपेशकुमार अहिरे यांनी आरोग्य भवन; मुंबई यांच्याकडे केली होती पण या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर अहिरे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार आता दोन्ही संस्थांविरुद्ध १ जून रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विविध संस्थांना चालक पुरविल्याचे दाखले- यशोधरा महिला औद्योगिक उत्पादन संस्था, नाशिक आणि राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्था, पालघर यांनी वाहनचालक पुरविल्याची बनावट कागदपत्रे सादर केली. - तसेच, वार्षिक उलाढाल किती रुपयांची आहे यासंबंधीची प्रमाणपत्रेही बनावट सादर केली. या शिवाय, कामगार आयुक्त यांच्याकडील ईएसआयसीचे बनावट प्रमाणपत्र, बनावट चलन, जीएसटीची खोटी प्रमाणपत्रे जोडून आरोग्य विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी आता भादंविच्या कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ४२०, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

संस्थांचाही इन्कारयशोधरा संस्थेने हंसा सिटी बस सर्व्हिसेस नागपूर, नोबल ड्रग्ज लि. सातपूर (नाशिक), महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ, सुमंगल मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग कंपनी; मालेगाव, सेंट डोमेस्टिक आश्रम नागपूर, या संस्थांना वाहनचालक पुरविल्याची प्रमाणपत्रे सादर केली. या पाचही संस्थांनी अशी प्रमाणपत्रे दिलेली नाहीत, असे लेखी दिले. 

अटकपूर्वसाठी धावाधावयशोधरा संस्थेच्या अध्यक्ष संगीता दशपुते आणि राजर्षी शाहू संस्थेचे अध्यक्ष जनार्दन चांदणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आपण चौकशीला सहकार्य करू, तक्रारकर्त्याने जाणूनबुजून दोनच संस्थांना लक्ष्य केले आहे, असे चांदणे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfraudधोकेबाजी