शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

रखडले अग्निशमन केंद्र

By admin | Updated: October 31, 2016 01:13 IST

हडपसर परिसरात गेल्या काही वर्षांत आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या.

हडपसर : हडपसर परिसरात गेल्या काही वर्षांत आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यात वित्तहानी व जीवितहानीही झाली. त्यामुळे हडपसर परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या व पालिका प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.अडीच वर्षांपूर्वी मगरपट्टा चौकातील लोहियानगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीत काहींना प्राणास मुकावे लागले. गाडीतळ, अमरनगरी येथे, तसेच काही दुकानांना आगी लागण्याचे प्रकार घडले. गेल्या काही वर्षांत आगीच्या घटना वारंवार घडलेल्या असतानाच पंधरा नंबर येथील बेकरीला आग लागली. आगीच्या घटना घडल्यास हडपसरमध्येच स्वतंत्र अग्निशमन केंद्राची आवश्यकता आहे.आग लागल्यानंतर काही तास संपर्क करूनही अनेक वेळा उपाययोजना मिळत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी यांच्या कुरघोडी राजकाराणांमुळेच याठिकाणचा स्वतंत्र अग्निशमन केंद्राचा प्रश्न प्रलंबित राहिला असून, त्याकडे पालिका प्रशासनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे. आश्वासनांची पूर्ती नाहीचवारंवार आगी लागण्याच्या घटना घडल्यानंतर या परिसरातील लोकप्रतिनिधी येतात, बाधितांचे सांत्वनही करतात. लवकरच हडपसरसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याचे आश्वासनही गेल्या काही वर्षांत अनेक वेळा या राजकीय मंडळींनी दिले आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतेही काम करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.हडपसर उपनगर हे झपाट्याने विकसित होत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी आहे. महापालिका उद्योजकांना कोणत्याही सुविधा देत नाही. कराचा बोजा मात्र लादते, असे येथील उद्योजकांचे म्हणणे आहे.