शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 05:48 IST

देशाचा कल कुणीकडे आहे, हे हरयाणाच्या निकालाने दाखवून दिले. काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नागपूर/शिर्डी :वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी मातृभाषेत पुस्तके उपलब्ध नव्हती, परंतु केंद्र सरकारने ही कमतरता दूर केली आहे. आता महाराष्ट्रातील युवकांनाही मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न ते पूर्ण करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला.

केंद्रीय वैद्यकीय आयोगाने मंजुरी दिलेल्या राज्यातील १० वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो धावपट्टी व टर्मिनल इमारतीचे तसेच शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन बुधवारी पंतप्रधान मोदी  यांनी केले.

काँग्रेस बेजबाबदार पक्ष

देशाचा कल कुणीकडे आहे, हे हरयाणाच्या निकालाने दाखवून दिले. काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. 

कुठे असतील ही महाविद्यालये?

ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा, गडचिरोली.

आज आपण केवळ इमारती बांधत नाही, तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. यामुळे महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागा निर्माण होतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

काही वर्षांतच नागपूर विमानतळावरून १०० विमानांची सेवा सुरू होईल. दरवर्षी १४ लाख प्रवासी ये-जा करतील आणि ९ लाख टन कार्गोची निर्यात होईल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

नागपूर विमानतळ हे आता विदर्भासाठी ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल. विमानतळाच्या प्रत्येक कामावर मी सुपरवायझरसारखे लक्ष ठेवणार आहे. - नितीन गडकरी, रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री.

कार्गो धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीमुळे नागपूर विमानतळ जागतिक दर्जाचे बनेल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMedicalवैद्यकीय