शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : दिलासादायक स्थिती, गेल्या सात महिन्यांत राज्यातील मासिक मृत्यूंमध्ये कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 07:54 IST

Corona Virus : राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाख्यानंतर आता राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. मागील सात महिन्यातील राज्यातील मासिक मृत्यूंमध्येही मोठी घट झाली असून हे प्रमाण आता हजारांच्या आत आल्याची दिलासादायक स्थिती आहे.राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे. तसेच, एप्रिल महिन्यात १.६५ टक्के मृत्युदराची नोंद झाली होती, हे प्रमाणही आता कमी झाले असून सध्याचा मासिक मृत्युदर १.३९ टक्के आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आलेखही महिन्यागणिक उतरता असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक अहवालातून समोर आली आहे. राज्यात एप्रिल २०२१ मध्ये १,७८,४०६ रुग्णांचे निदान झाले होते, १ ते २७ ऑक्टोबर या काळात हे प्रमाण ५३,०५६ वर आले आहे. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास दोन टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. प्रतिदिन जवळपास दीड लाख चाचण्या केल्या जात असून यात १५०० ते १८०० रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. ही गेल्या वर्षी मे नंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या असून संसर्गाचा प्रसार मागच्या काही दिवसांपासून नक्कीच कमी झाला आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाधितांचे प्रमाण हे पाच टक्क्यांहून कमी असणे म्हणजे साथ नियंत्रणाखाली आहे, असे म्हणतात. 

राज्यात लसीकरणात पाच जिल्हे आघाडीवरराज्याने नुकताच नऊ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे दोन्ही लस घेतलेल्या लाभार्थींच्या संख्येनेही तीन कोटींचा पल्ला गाठला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यात पाच जिल्हे आघाडीवर असून, या पाच जिल्ह्यात सुमारे एकूण ४५ टक्के लसीकरण पार पडले आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात एकूण सहा कोटी ६१ लाख ३३ हजार ८८६ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला असून, तीन कोटी एक लाख ४९ हजार ६६५ लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशपातळीवर लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून, त्याखालोखाल राज्याने स्थान मिळविले आहे. राज्यात जून महिन्यात सरासरी तीन लाख ३२ हजार १४४ दैनंदिन मात्रा देण्यात आल्या, तर हे प्रमाण जुलै महिन्यात तीन लाख ९१ हजार ७१४ इतके होते. 

आगस्ट महिन्यात चार लाख ६७ हजार २२२, सप्टेंबर महिन्यात सात लाख ६० हजार ९५५ आणि १ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ५ लाख ५३ हजार ३८४ दैनंदिन मात्रा दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लाभार्थींचे प्रमाण ७२.३३ टक्के आहे, तर १८ - ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ६३.६५ टक्के आहे. याखेरीज, ४५हून अधिक वय असणाऱ्या कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ७६.४६ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस