शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"राजकारण संपलं वाटतानाच देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन् केंद्रात मंत्रिपद मिळालं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 10:32 IST

गोपीनाथ मुंडे यांचा मत्यू झाल्यानंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांनाच २०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले.

नाशिक - स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मला राजकारणात आणले, त्यांच्या मृत्यूनंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांना एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी बायोडाटा मागितला. दुसऱ्या दिवशी राज्यसभेसाठी अर्ज भरायचा असल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निरोप त्यांनी दिला. राज्यसभेत बिनविरोध निवडून आलो आणि केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागली, असा प्रवास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी उलगडला. त्यावेळी मंत्रीपदासाठी चर्चेत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

नाशिकमध्ये आयोजित वंजारी युवा सन्मान सोहळ्याप्रसंगी डॉ. कराड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला उजाळा दिला. असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स तर्फे आयोजित राज्यस्तरीय वंजारी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आपणाला राजकारणात आणले. १९९७ मध्ये त्यांनीच उपमहापौर केले, १९९९ मध्ये महापौरही केले. २००६ साली पुन्हा संभाजीनगरचा महापौर झालो.

दुर्दैवाने, गोपीनाथ मुंडे यांचा मत्यू झाल्यानंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांनाच २०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले हे पद असल्याने आता यापेक्षा मोठे पद मिळणार नाही, असे वाटत होते. परंतु २०१९ मध्ये फडणवीस यांनी पुन्हा फोन करून बायोडाटा मागवून घेतला. तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविला. त्यानंतर दिल्लीतून बोलावणे आले आणि राज्यसभा आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद मिळाले, असा प्रवास कराड यांनी उलगडला.

स्मार्ट मेहनत आणि प्रामाणिक कामाबरोबरच जिद्द ठेवली तर यश नक्कीच मिळते असे सांगताना कराड यांनी समाजाचा अभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे. यश मिळाल्यानंतर मागे वळून पहावे आणि जनमाणसात राहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी उपस्थित तरुणांना दिला.

डिजिटल करन्सीला प्राधान्यकार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना डॉ. कराड यांनी केंद्राच्या धोरणानुसार डिजिटल करन्सीला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. डिजिटल' करन्सीमुळे सुरक्षितता वाढून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार कमी होतीलच, शिवाय नोटांच्या छपाईवरील खर्च कमी होणार असल्याचे सांगितले. नोट प्रे कामगारांची नाराजी असेल तर त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhagwat Karadडॉ. भागवतAmit Shahअमित शाह