शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचा व्हॉट्सअॅप ग्रुप

By admin | Updated: July 6, 2017 18:30 IST

जवळचे भाडे नाकारणे, मनात येइल तेव्हाच रस्त्यावर गाड्या धावणे, यासह प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मनमानी भाडी आकारणे अशा काही रिक्षाचालकांच्या उद्दाम

- अनिकेत घमंडी/ऑनलाइन लोकमत
 
डोंबिवली, दि. 06 - जवळचे भाडे नाकारणे, मनात येइल तेव्हाच रस्त्यावर गाड्या धावणे, यासह प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मनमानी भाडी आकारणे अशा काही रिक्षाचालकांच्या उद्दाम पणाला डोंबिवलीकर वैतागले आहेत. अशा मनमानी कारभार करणा-या रिक्षाचालकांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत व्हाट्सअ‍ॅप ग्रुप स्थापन केला आहे. त्यावर कोणाला रिक्षा चालकाचा कटू-चांगला अनुभव आल्यास तातडीने तो शेअर करावा, संबंधितांचा तात्काळ योग्य तो समाचार घेण्यात येणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून या गृपी चर्चा सुरु झाली आणि बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे अडीचशेहून अधिक सदस्यांनी हा ग्रुप स्विकारत आपापली मते स्पष्ट केली. ज्या सदस्यांनी एकत्र येत हा ग्रुप स्थापन केला, त्यांनी तातडीने एक बैठक लावावी असे आवाहन करण्यात आले. त्यात केवळ रिक्षाचालकच नव्हे तर मुजारी करणारे कोणीही वाहनचालक असो त्यांची मुजोरी मोडीत काढण्यात यावी याबद्दल सगळयांचे एकमत झाले. एवढेच नव्हे तर वाहन चालकांची कार्यशाळा घ्यावी, त्यांना रस्ता वाहतूकीचे नियम सांगावेत तसेच वाहतूक नियंत्रण आणि आरटीओ अधिका-यांशी चर्चा करणे आदी उपक्रम सातत्याने घेण्यात यावेत यावर सगळयांचे एकमत झाले. तसेच जो कोणी वाहनचालक चांगले काम करेल त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात यावा, चांगुलपणा आणि सामाजिक बांधिलकी या निमित्ताने वाढीस लागावी हा प्रमुख प्रयत्न असेल अशीही सकारात्मक चर्चा ग्रुपवर करण्यात आली. नियमानूसार रिक्षा चालवणे, तीन सीट घेण्यात याव्यात, मीटर पद्धत सुरु करा आदी मत देखिल मांडण्यात आली.
 
- विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पाठींब्या शिवाय हा चमू स्थापन करण्यात आला आहे. तो अबाधित रहावा असे सर्वानूमते ठरवण्यात आले आहे. त्यात आरटीओ, ट्रॅफिकसह रिक्षा चालक-मालक युनयिन पदाधिका-यांचाही समावेश करण्यात आला असून हळुहळू त्याची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन एकमेकांना करण्यात येत आहे. त्यातून जनजागृती होईल, आणि जो कोणी उपद्रवी असेल त्याला वेळीच चाप बसेल असा प्रयत्न असल्याचे ठरवण्यात आले.
 
ग्रुपवर लोकमतची चर्चा : बुधवारच्या लोकमतमधील हॅलो ठाणे मध्ये केडीएमटी प्रवाशांच्या मदतीला अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची चर्चा दिवसभर ग्रुपवर सुरु होती. नागरिकांनी केवळ बसनेच प्रवास करावा, रिक्षाने प्रवास करु नये असे आवाहन देखिल करण्यात आले. अनेक सदस्यांनी त्यास पाठींबा बसने प्रवास कराच. त्याशिवाय रिक्षाचालकांचा मनमानी कारभार कमी होणार नाही असे परखड मत व्यक्त करण्यात आले.