शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"बॅचलर राहू नका..., घरात बायको असली की माणसाचं डोकं शांत राहतं;" तरुणांना उद्देशून ओवेसी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 14:01 IST

धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? असा प्रश्नही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ओवेसी यांनी विचारला आहे...

एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना राजकीय धर्मनिरपेक्षतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच राज्य सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. याच वेळी त्यांनी बॅचलर मुलांसंदर्भातही, असे वक्तव्य केले आहे, की ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

बॅचलर्ससंदर्भात काय म्हणाले ओवेसी -तरुणांमध्ये जोश निर्माण करताना ओवेसी म्हणाले, लग्न करणार ना, बॅचलर (अविवाहित) राहू नका, बॅचलर फार त्रास देत आहेत. बायको घरात असली की माणसाचे डोकेही शांत राहते. खरे तर, ओवेसी मुस्लीम तरुणांना विचारत होते, की त्यांना त्यांच्या मुलांना अशिक्षित आणि गरीबच ठेवायचे आहे का? ते म्हणाले, 'जे तरुण आता 18-19 वर्षांचे आहेत, त्यांचे लवकरच लग्न होईल, त्यांना मुले होतील. यापुढे ओवेसींनी तरुणांना विचारले की, 'लग्न करणार ना? तुमच्या मुलांना त्यांचे हक्क मिळू नयेत, असे तुम्हाला वाटते का?'

धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? -धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? असा प्रश्नही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ओवेसी यांनी विचारला. ते म्हणाले, आपल्याला नौकऱ्या आणि शिक्षाणात आरक्षण मिळाले नाही, निर्णय घेण्यात आपला वाटा नव्हता, कुठलाही अधिकार नव्हता, धर्मनिरपेक्षता शब्दाने मुस्लिमांचे नुकसानच झाले आहे. महाराष्ट्रात, केवळ 22 टक्के मुस्लीम प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतात तर केवळ 4.9 टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. तसेच, महाराष्ट्रातील 83 टक्के मुस्लीम भूमिहीन आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हृदय केवळ मराठा समाजासाठीच  धडकते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. याच बरोबर त्यांनी मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यावरही  नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMumbaiमुंबईMuslimमुस्लीम