शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

उग्र आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका; भाजपचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:47 AM

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार दारूवरील कर कमी करत आहेत; पण सरकारला इंधनावरील कर कमी करण्यास वेळ नाही.

मुंबई  : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे; पण त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असून, वेळेत निर्णय घ्या, उग्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा भाजपने दिला आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार दारूवरील कर कमी करत आहेत; पण सरकारला इंधनावरील कर कमी करण्यास वेळ नाही.  गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे; पण सरकारला या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची काळजी आहे. सरकारने विलीनीकरण जाहीर करून चर्चेला बोलवावे. जर एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले तर सरकार जबाबदार असेल. भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकार जर कर्मचाऱ्यांशी न बोलता फक्त माध्यमाशी  बोलत आहे,  त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्रातील लोकांचे हाल व्हावे, असे एसटी कर्मचारी यांना बिलकुल वाटत नाही; पण हे सरकार योग्य तो निर्णय का घेत नाही, सरकारला निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने अडवले नाही. मग  हे विलीनीकरणाबाबत  का निर्णय घेत नाहीत. 

ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तरी त्यांना पहिले खात्यात घ्या. मी पोलिसांना आव्हान करेन की जर गुरुवारी गाड्या अडावल्या तर हे आंदोलन तीव्र होईल, आम्ही गनिमी कावा करून मंत्रालयावर आंदोलन करणार आणि त्यासाठी आम्ही आमचे राखीव माणसे बाहेर काढू.- सदाभाऊ खोत, माजी मंत्री, संस्थापक, रयत क्रांती संघटना 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरST Strikeएसटी संपSadabhau Khotसदाभाउ खोत