शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारांना पाठिशी घालू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 04:53 IST

जयंत पाटील : ...तर अधिकाऱ्यांवर कारवाई

नागपूर : राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावरकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाºया शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

विद्या चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये अवैध सावकारी संदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकाळ चर्चेच्या उत्तरात पाटील बोलत होते. ते म्हणाले, माजी मंत्री आर.आर. पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात कायदा आणला.या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व निबंधकांना दिल्या आहेत. मात्र अवैध सावकारांविरुद्ध सहकार विभागातील उपनिबंधक कारवाई करण्यास टाळटाळ करत असल्याबाबतच्या गंभीर तक्रारी आहेत. अशा अधिकाºयांच्या विरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी तसेच अवैध सावकारी कायद्यात सुधारणा सुचविण्याचे काम ही समिती करणार आहे.

मागील पाच वर्षात राज्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली. तीन महिन्यात यावर जरब बसविण्यासाठी सावकारी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. या समितीत विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास आदींचा समावेश असेल तसेच सहकार व महसूल विभागातील अधिकारी दिले जातील, अशी माहिती पाटील यांनी दिली. अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी या समितीने सुचविलेल्या सूचनांचा समावेश कायद्यात करण्यात येईल.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन