शिर्डी (जि. अहमदनगर) : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत साईदर्शनाने करण्यासाठी आलेल्या भाविकांनी असुविधेकडे दुर्लक्ष करीत तब्बल साडेअकरा कोटींची दक्षिणा साईचरणी अर्पण केली़ नव्या वर्षातील देणगीच्या पहिल्याच मोजदादीने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास २५ लाखांनी वाढ झाली़२५ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात दानपेटीत जमा झालेल्या रकमेची शुक्रवारी मोजदाद करण्यात आली़ यात दक्षिणापेटीत ६ कोटी ९० लाख रुपये रोख, ६८ लाखांचे सोने व ४ लाखांची चांदी मिळून आली़ याशिवाय याच काळात देणगी कक्षात, रोख, चेक, डीडी आणि आॅनलाइन अशा विविध माध्यमांतून ३ कोटी ८० लाखांची रक्कम जमा झाली़ एकत्रित आकडा जवळपास साडेअकरा कोटी रुपये आहे़
बाबांना साडेअकरा कोटींचे दान
By admin | Updated: January 3, 2015 01:34 IST