शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या धाडसी महिलेने चोराला पकडले

By admin | Updated: May 12, 2017 03:22 IST

बसमध्ये चढताना पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या चोरावर डोंबिवलीतील एका महिलेने सतत सात दिवस पाळत ठेवून त्याला पोलिसांच्या हवाली केले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बसमध्ये चढताना पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरणाऱ्या चोरावर डोंबिवलीतील एका महिलेने सतत सात दिवस पाळत ठेवून त्याला पोलिसांच्या हवाली केले. चोरीचा तपास स्वत:च करून चोराला पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या या धाडसी महिलेने समाजाला सजग राहण्याची शिकवण यातून दिली आहे.अकोल्याचे सामाजिक कार्यकर्ता सागर सिद्दीकी यांच्या कन्या सबा सिद्दीकी लग्नानंतर डोंबिवली येथे स्थायिक झाल्या. पर्यटन व्यवसायात असलेल्या सबा ३ मे रोजी डोंबिवलीतील राहत्या पलावा सोसायटीजवळून वाशी-कल्याणमध्ये बसमध्ये बसल्या. बसमध्ये चढताना त्यांची पर्स चोराने पळवली. त्यात सुमारे ७ हजार रुपये, ओळखपत्र, एटीएमसह इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी बसमध्ये पर्सची शोधाशोध सुरू केली. बसमध्ये चढताना त्यांच्यामागेच एक प्रवासी चढला आणि बस सुरू होण्यापूर्वीच गडबडीत उतरला. त्यानेच पर्स चोरी केली असावी, अशी शंका काही प्रवाशांनी व्यक्त केली. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असून त्याचे फुटेज कल्याण-डोंबिवली पालिकेतून मिळवण्याचा सल्ला बसच्या वाहकाने दिला. त्यानुसार सबा सिद्दीकी देसाईनाक्याजवळ बसमधून उतरल्या. त्यानंतर, त्या आणि पती डॉ. शेख दोघेही त्यांच्या सोसायटीजवळच्या बसथांब्यावर आले. तिथे त्यांना बसमध्ये त्यांच्या मागून चढणारी ती व्यक्ती दिसली. सबा यांना पाहताच घाबरून त्याने मोटारसायकलवरून पळ काढला. दोघांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, सबा यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित करून त्यांना शीळ-डायघर पोलीस ठाण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला. डायघर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि त्यांना बसमधील सीसी कॅमेऱ्याचे फुटेज देण्यासंदर्भात पालिकेच्या नावे पत्रही दिले. सबा यांनी महत्प्रयासाने फुटेज मिळवले. या फुटेजमध्ये आरोपी त्यांच्या बॅगमधून पैशाची पर्स काढताना स्पष्ट दिसला. सभा यांनी आरोपीची माहिती काढण्यास सुरुवात केली असता, तो त्यांच्याच सोसायटीत भाड्याने राहत असल्याचे समजले. त्यानंतर, सबा यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. मंगळवारी तो सोसायटीतील किराणा दुकानावर दिसला. त्यांनी लगेच पती, काही मित्रमैत्रिणी आणि पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आरोपीला गाठून चोरीबाबत विचारणा केली. त्याने सबा यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या घाबरल्या नाहीत. त्याला वादात गुंतवून ठेवले. पोलीस तिथे येताच त्यांच्या स्वाधीन केले. त्योच नाव रूपेश लोखंडे असून तो मूळचा सोलापूरचा आहे. त्याने गुन्ह्याची कबुली त्याने दिली असून सबा यांची कागदपत्रेही परत केली. सखोल तपासाची गरज-पोलिसांनी रूपेश लोखंडे याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याजवळ चोरीच्या १० ते १२ बॅग आढळल्या. याशिवाय लोकांची ओळखपत्रे, पॅनकार्ड आणि अनेक एटीएमही पोलिसांना सापडले. काही अमली पदार्थही या आरोपीच्या घरात सापडले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे, असे मत सबा सिद्दीकी यांनी व्यक्त केले आहे. मानसिकता बदलण्याची गरज-नियमानुसार कोणत्याही घटनेची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात देणे शक्य आहे. त्यामुळे पोलिसांनी हद्दीचे कारण देऊन सबा सिद्दीकी यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे योग्य नव्हते. सीसी कॅमेऱ्याचे फुटेज मिळवून काय करणार, चोर एकाच ठिकाणी थांबत नाही, चोरी झालेली कागदपत्रे नव्याने तयार करून घ्या, आपण आधीच सतर्क राहायला हवे, असे सल्ले पोलिसांनी सबा सिद्दीकी यांना दिले. ही नकारात्मक मानसिकता पोलिसांनी बदलण्याची गरज असल्याचे सिद्दीकी म्हणाल्या.