शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डोंबिवलीत कोसळली इमारत

By admin | Updated: July 5, 2017 06:28 IST

आयरे रोडवरील गंगाराम सदन या धोकादायक इमारतीचा एक भाग मंगळवारी दुपारी कोसळून भुईसपाट झाला. या घटनेत जीवितहानी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : आयरे रोडवरील गंगाराम सदन या धोकादायक इमारतीचा एक भाग मंगळवारी दुपारी कोसळून भुईसपाट झाला. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. यामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या इमारतीचा दुसरा भाग रिकाम करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. आयरे रोडवर गंगाराम सदन ही दुमजली इमारत होती. तिला लागून याच इमारतीचा चार मजल्याचा आणखी एक भाग आहे. त्यातील दोन मजल्याची इमारत दुपारी एकच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. इमारतीत तीन कुटुंबे राहत होती. तळमजल्यावर इस्त्रीचे दुकान होते. कुटुंबातील व्यक्ती काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या, तर इमारत पडण्याच्या आवाजाने इस्त्रीवाल्याने पळ काढल्याने तोही बचावला. ही इमारत ४० वर्षापूर्वी बांधली होती. ती गंगाराम केणे सदन या नावानेही ओळखली जाते. ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पण याच इमारतीच्या शेजारचा चार मजली इमारतीचा भाग मात्र धोकादायक नसल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. पण नंतर हा चार मजली भागही रिकामा करण्यास सांगण्यात आले. कल्याण-डोंबिवलीत ५०२ धोकादायक इमारती आहेत. त्यातील २०२ इमारती अतिधोकादायक आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त घरत यांनी दिली. धोकादायक इमारत दुरुस्ती करण्यायोग्य असल्यास दुरुस्तीचा प्रस्ताव महापालिकेला सादर केल्यास दुरुस्तीची परवानगी दिली जाईल. तशी नसल्यास इमारतीच्या पुनर्बांधणीला मंजूरी दिली जाईल, असे घरत म्हणाले.पालिकेचा क्लस्टर प्रस्ताव फेटाळलामहापालिकेने राज्य सरकारकडे पाठवलेल्या क्लस्टरच्या प्रस्तावात नॅशनल बिल्डींग कोड न टाकल्याने हा प्रस्ताव फेटाळला जाईल, असा आरोप कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे पदाधिकारी सुनील नायक यांनी केला. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी मात्र पालिकेने क्लस्टर विकास योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याचे सांगितले. पालिकेने क्लस्टरला मंजुरी देताना नॅशनल बिल्ंिडग कोडचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. त्यामुळे या योजनेच्या मंजूरीत त्रूटी राहून त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळणार नाही, असे पत्र नायक यांनी पाठवले. क्लस्टर विकास योजना मंजूर करताना पालिकेने नागरिकांच्या हरकती सूचना घेतल्या नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटहोत नसल्यास पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्या-विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत राघवेंद्र सेवा संस्थेने २०१५ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील सुनावणी दोन महिन्यात अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.