शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:35 IST

दीड किलो वजन घटले; सरकारकडून दोन दिवसांत दखल नाही

राळेगणसिद्धी : उपोषणामुळे अण्णा हजारे यांचे वजन पहिल्या दोन दिवसातच दीड किलोने घटले आहे. वयामुळे अण्णांचा रक्तदाबही अनियमित असल्याने त्यांनी जास्त काळ उपोषण करणे धोक्याचे आहे, असा सल्ला डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी दिला. अण्णा मात्र उपोषणावर ठाम आहेत. पहिल्या दोन दिवसात अण्णांशी सरकारकडून कुणीही संपर्क केलेला नाही. जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय अधिकारीही राळेगणकडे फिरकलेले नाहीत.लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, राज्यांमध्ये लोकायुक्ताचा कायदा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी अण्णांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. यादवबाबा मंदिरात हे उपोषण सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे अण्णांच्या आंदोलनात शिष्टाई करत होते. मात्र, दिल्लीबाबत काहीच निर्णय घेऊ शकत नसल्याने त्यांना शिष्टाईसाठी येण्यासही अण्णांनी व गावकऱ्यांनी नकार दिला.अण्णांचे दोन दिवसातच १ किलो ७०० ग्रॅम वजन घटले आहे. अण्णा सध्या ८१ वर्षांचे आहेत. अण्णांनी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण केल्यास त्यांच्या अवयवांना गंभीर धोका पोहोचू शकतो, असे डॉ. पोटे यांनी सांगितले. अण्णांना मौन पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण बोलण्यानेही त्यांच्यातील शक्ती कमी होत आहे.सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय : अण्णा हजारेजनलोकपालच्या मागणीसाठी देशभर विविध राज्यात आंदोलने सुरु होत आहे. मात्र, सरकार या आंदोलकांवर दडपशाही करुन आंदोलने दडपत आहे, असे अण्णा म्हणाले. अण्णांच्या पाठिंब्यासाठी १५ राज्यात ३५ ठिकाणी आंदोलने सुरु झाली आहेत. तसेच राज्यात २५ जिल्ह्यांच्या ठिकाणी व वेगवेगळ्या ७३ गावांमध्ये गुरुवारी आंदोलन झाले, अशी माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या वतीने देण्यात आली.मुंबईतील डब्यावाल्यांचाही पाठिंबाआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील डब्यावाल्यांनीही पुढाकार घेतला आहे़ डब्यावाल्यांच्या मुलांनी शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांची भेट घेतली़हजारे यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह भेटणारनाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी पुन्हा जातानाच मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन जाणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले. अण्णांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेBJPभाजपा