सावंतवाडी : मला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचे होते. पण वडिलांचे क्षेत्र अभिनयाचे असल्याने मी या क्षेत्रात आले. कोणतेही काम करा, पण शिक्षण पूर्ण करा, असा सल्ला अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी दिला. त्या श्रीराम वाचन मंदिरात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांची प्रा. अरुण पणदूरकर यांनी मुलाखत घेतली. मला खरा ब्रेक थ्रू मिळाला तो ‘मंतरलेले पाणी’ नाटकातील सखीच्या भूमिकेतून, असे सांगत त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्याने मला लगेच संधी मिळाली. यानंतर मी माझे करियर सुरू केले. जागतिक पातळीवरील रंगभूमी कोर्स ३ वर्षे केला. घरातूनही वडिलांचा पाठींबा होता. यामुळे मी १९७६ मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर आले. २५ फेब्रुवारी १९७६ मध्ये पहिले नाटक ‘कस्तुरी मृग’ केले. हे नाटक कठीण होते. या नाटकात सतरा बायका व दोन पुरुषांचा समावेश होता. वडिलांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या रोजच्या रिहर्सल्समुळे मी नाटक क्षेत्रात सहज प्रगती केली. नाटकासाठी वडिलांचे मला कायम सहकार्य होते. ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबांची भूमिका केली होती. यावेळी मला वडिलांचाही विरोध होता. तरीसुध्दा मी हट्ट धरून काम केले. नाट्य क्षेत्रापासून मी कधीही दूर गेले नाही. नाटकाची ओढ पहिल्यापासूनच होती. गांधी फिल्ममधील कस्तुरबा ही भूमिका ५५ वर्षांच्या बाईची होती. यावेळी मी ३० वर्षांची होते. तरीही एक म्हातारी बाई म्हणून अगदी सहजपणे ही भूमिका मी साकारली होती. परंतु यानंतर माझ्यावर ५५ वर्षांची बाई असाच शिक्का बसला आणि मला बाईच्या भूमिका कराव्या लागल्या. (वार्ताहर)काळजाला भिडेल तोच अभिनयहिंदी चित्रपटातील कलाकारांना थिएटरचा टी माहीत नसतो. कारण यांनी कधीही थिएटरमध्ये काम केलेले नसते. आम्हाला प्रत्येक सीरियलमध्ये काम करण्यासाठी अलर्ट रहावे लागते. कारण ७५ चा भाव पाचव्या क्रमांकावर आणता येत नाही. मात्र, हिंदी चित्रपटात हे शक्य असते, असे सांगून अभिनय हा अभिनय असतो. मला खरा अभिनय, खोटा अभिनय असे कोणालाही सांगायचे नाही. परंतु काळजाला भिडेल, तोच अभिनय, असेही स्पष्ट केले.
बनायचे होते डॉक्टर, झाले अभिनेत्री
By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST