शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हकालपट्टी केलेल्यांना कारमध्ये घेऊन फिरता का?; शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:26 IST

कालपर्यंत ही सर्व मंडळी तुम्हाला चांगली वाटत होती व तुम्हाला सोडल्यानंतर हे तुम्हाला गुन्हेगार वाटत आहेत असं नरेश म्हस्के म्हणाले.

मुंबई - बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार हे संजय राऊत यांनी संपवलेले आहेत. आपल्या नेत्यांना राष्ट्रवादीची लाचारी करायला लावलेली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वीचा संजय राऊत यांचा दौरा पाहा व त्यांचे व्हिडिओ पाहा. ही सर्व मंडळी संजय राऊत त्यांच्या आजूबाजूला होती जर तुम्ही त्यांची हकालपट्टी केली होती तर कारमध्ये घेऊन का फिरत होते असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना लगावला आहे. 

नरेश म्हस्के म्हणाले की, गेल्या आठवड्यातच नाशिककर संजय राऊत यांचे बारा वाजवणार असं सांगितलं होतं व त्यांना क्लीन बोल्ड करणार. चार टप्पे बॉलवर त्यांची विकेट गेली होती. आज नाशिक मधील १२ नगरसेवकांनी 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करण्यासाठी सुरुवात केली आहे. आज आपण पाहिलं रोज सकाळी भोंगा  राष्ट्रवादीच्या स्क्रिप्टनुसार वाजतो. त्याचा आवेश कमी झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊत जेव्हा नाशिक दौऱ्यावरती होते तेव्हा अजय बोरस्ते यांच्या बरोबर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व नगरसेवक आलेले आहेत असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना दलाल कॉन्ट्रॅक्टर असे सर्व वाटू लागले आहेत. कालपर्यंत ही सर्व मंडळी तुम्हाला चांगली वाटत होती व तुम्हाला सोडल्यानंतर हे तुम्हाला गुन्हेगार वाटत आहेत. संजय राऊत तुम्हीही दुटप्पी भूमिका सोडून द्या, शिवसेनेची वाताहत तुमच्यामुळे झाली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला पक्ष हिंदुत्ववादी विचार सोडून द्यायला तुम्ही लावलं आणि शिवसेना पक्ष तुम्ही लाचार करण्याचं काम केलं असा आरोप नरेश म्हस्केंनी केला. 

दरम्यान, तुमच्यासोबत होते तोपर्यंत चांगले आणि आता सोडलं तर वाईट. हे फक्त १२ नगरसेवकच नाही तर ३२ नगरसेवक आहेत. त्या ३२ नगरसेवकांमधला बारा नगरसेवकांचा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा काही दिवसात तुम्हाला दिसेल व त्या ठिकाणी किती शिल्लक राहतील हे २०२४ पर्यंत पाहा. तुम्हाला औषधाला सुद्धा माणूस या ठिकाणी सापडणार नाही असा इशारा नरेश म्हस्केंनी संजय राऊतांना दिला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे